लायन्स क्लब ऑफ कोपरगाव अध्यक्ष पदी रामदास थोरे यांची निवड..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
लायन्स क्लब ऑफ कोपरगाव अंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम तसेच कोविड काळात समाजोपयोगी कामे करत समाजाशी आजही घनिष्ट संबंध प्रस्थापित केले आहे. या वर्षी लायन्स क्लब ऑफ कोपरगाव ५१ व्या वर्षात पदार्पण करीत असून २०२१-२२ या वर्षाकरिता लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे अध्यक्ष पदी श्री. रामदास थोरे,

उपाध्यक्ष पदी श्री. परेश उदावंत,

सेक्रेटरी पदी श्री.अक्षय गिरमे,

खजिनदार पदी श्री. सुमित भट्टड

आदिंची लायन्स क्लब ऑफ कोपरगाव च्या संचालक मंडळावर महत्वपूर्ण निवड झाल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे जेष्ठ संचालक श्री.तुलसीदास खुबाणी यांनी दिली.

लायन्स क्लब च्या माध्यमातून मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये विशेष करून गरजवंतांना अन्नधान्य वाटप, डायलिसीस सेंटर अशा महत्वपूर्ण उपक्रमांचा समावेश होता. तसेच जयपूर फुट कॅम्प, प्लास्टिक सर्जरी शिबीर, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, बिझनेस एक्स्पो अशा प्रकारचे नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबविले जातात.
अध्यक्षपदी निवड झालेले श्री.रामदास थोरे यांनी २०१७ साली लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे सेक्रेटरी म्हणुन पद भूषवित असताना लायन्स क्लबचा ‘बेस्ट सेक्रेटरी’ या पुरस्काराने सन्मानित आहे. तर २०१९-२० मध्ये लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे उपाध्यक्ष म्हणून पद भूषविले आहेत. तसेच नाशिक, अहमदनगर, पुणे या तिन्ही जिल्हे मिळून निघणाऱ्या ‘सह्याद्री लायन’ मासिकाचे ‘सहसंपादक’ म्हणून काम पाहत आहे. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान लायन्स क्लबला लाभले असून पुढेही फायदा व्हावा अशी इच्छा व्यक्त करण्यात आली. या निवडीबद्दल लायन्स क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह सर्व स्तरातून अभिनंदन केले जात असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *