बेशर्मीकी भी हद होती है नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद यांची उपनगराध्यक्ष निखाडे यांच्यावर टीका..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहराच्या नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी शहर विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे.मात्र ज्यांच्या नेत्यांना निधी द्यायचे माहीत नसून शहर विकासाचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळवायचा माहीत आहे त्यांच्या बोलक्या पोपटांनी किमान जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी असा सल्ला देऊन बेशर्मीकी भी हद होती है अशा कडवट शब्दात अपक्ष नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात उपनगराध्यक्ष निखाडे यांच्यावर टीका केली आहे.
कोपरगाव शहरात आमदार आशुतोष काळे यांनी विविध विकास कामांचे केलेली उदघाटने कोल्हे गटाच्या नगरसेवकांच्या डोळ्यात खुपत असल्यामुळे आपल्या नेत्याच्या हुकुमावरून उपनगराध्यक्ष निखाडे यांनी नगराध्यक्ष व आमदार यांच्यावर टीका केली होती त्या टीकेचा समाचार घेतांना नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद यांनी विखारी शब्दात टीका केली आहे.ते म्हणाले की, कोपरगाव शहराच्या मतदारांनी विधानसभेत कमी मताधिक्य दिलेल्या रागातून शहरवासीयांना वेठीस धरून आपल्याकडे असलेल्या पाशवी बहुमताच्या जोरावर विकासकामे होऊ द्यायची नाही. कोरोना संकटामुळे आर्थिक चक्र मंदावले असतांना देखील आमदार आशुतोष काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी शहर विकासासाठी आणला आहे.नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या मदतीने सुरू केलेला शहर विकास विकासाशी देणं घेणं नसणाऱ्या कोल्हे गटाच्या नगरसेवकांना सहन होत नसून हीच कोल्हे गटाच्या नगरसेवकांची पोटदुखी आहे.ती पोटदुखीच आमदार आशुतोष काळे व नगराध्यक्ष यांच्यावर टीका करण्यास भाग पाडत असून ही पोटदुखी शहरातील सुज्ञ नागरिक चांगले जाणून आहेत. मात्र ज्यांना विकास आणि विकास निधी काय असतो हे माहिती नाही जे आपल्या निष्क्रिय नेत्याच्या तालावर नाचून शहराच्या विकासाला विरोध करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे त्यांनी टीका करतांना आपली लायकी ओळखावी जर लायकी ओळखता येत नसेल तर त्यांच्या एवढे बेशरम तेच कारण बेशर्मीकी भी एक हद होती है असे हाजीमेहमूद सय्यद यांनी शेवटी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *