राजकारण बाजुला ठेवून; विवेकभैय्या कोल्हे यांनी लोकनेते आमदार निलेशजी लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला दिली भेट..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
“महाराष्ट्रभर निलेशजी लंके पॅटर्न नावाजला आहे.कोरोनाच्या संकटात अतिशय चांगले काम करत असलेल्या आमदार निलेशजी लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला आज विवेकभैय्या कोल्हे यांनी भेट दिली..तिथे रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा,व्यवस्था यासह अन्य गोष्टींची माहिती जाणून घेतली.विविध गावचे सरपंच,पदाधिकारी यांचे दैनंदिन श्रमदान,लोकसहभाग हा आदर्शवत आहे..!!

आमच्या महाविद्यालयीन काळात एन एस एस कॅम्पच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये केलेल्या श्रमसंस्कारांची आठवण तिथले वातावरण पाहून झाली..!!

लोकनेते निलेशजी लंके यांच्या समवेत कोविड सेंटरला भोजनाचा आस्वाद घेतला,कोपरगावमध्ये आपण संजीवनी कोविड केअर सेंटर व देत असणाऱ्या सुविधा याबद्दलही चर्चा झाली..!!

कोरोनाला हरवण्यासाठी राजकिय पक्ष,गट तट बाजूला ठेऊन एकत्रपणे टीम वर्क करणे गरजेचे आहे..!!

अगदी मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी अनेक विषयांवर हितगुज साधले..!!

“कार्यातून मन सर्वांचे जिंके,
असे लोकनेते निलेशजी लंके”
-विवेकभैय्या कोल्हे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *