महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानकडून बस आगारात आरोग्यसेवा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगाव बस स्थानक आगार येथे सर्व कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाज निरोगी व सक्षम राहावा या उद्देशाने आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन युवानेते मा. श्री. विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

या प्रसंगी बोलताना विवेकभैय्या कोल्हे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला समानता, शिक्षण आणि प्रगतीचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजातील प्रत्येक घटकाचे आरोग्य सक्षम राहणे अत्यंत गरजेचे आहे. बस स्थानकातील कर्मचारी दिवसभर प्रवाशांची सेवा करत असतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे ही काळाची गरज आहे. या आरोग्य तपासणी शिबिरामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याची योग्य माहिती मिळेल तसेच वेळेवर उपचार घेण्यास मदत होईल.

या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या असून तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. या उपक्रमामुळे आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.सेवा हाच धर्म या विचाराने आम्ही कार्यरत असून सर्वसामान्यांना सेवा देणाऱ्यांची सेवा करण्यासाठी आजचा दिवस अतिशय प्रेरणादायी आहे असेही शेवटी म्हणाले. स्व.शंकरराव कोल्हे मोफत फिरता दवाखाना यावेळी सेवेसाठी उपलब्ध होता.
यावेळी नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेते प्रसाद आढाव,दिलीप दारूणकर,राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, संतोष शिंदे,अमोल अजमेरे,अतुल शेठ काले,फिरोज पठाण,संदीप देवकर, डी.आर. काले,संतोष गंगवाल,अविनाश पाठक,वैभव गिरमे,नासिरभाई सय्यद,योगेश बागुल, स्वप्नील मंजुळ, विक्रमादित्य सातभाई, दत्तू पगारे,दीपक जपे, सोमनाथ म्हस्के,राहुल खरात,कलविंदरसिंग दडीयाल,सतीश रानोडे, गोपीनाथ गायकवाड, रवींद्र रोहमारे,संतोष चावंडके, सोमनाथ रोठे,सलीम पठाण,सोमनाथ रोठे, जय प्रकाश आव्हाड,खालिक कुरेशी, निसार शेख,संदीप वाकचौरे,योगेश नरोडे, खालिक कुरेशी,संतोष शेजवळ,रिंकेश नरोडे, अभिषेक मंजुळ,प्रभूदास पाखरे, नाना भुजबळ,धनंजय आढाव, संतोष साबळे, बस आगाराचे प्रतिनिधी
आगार प्रमुख अमोल बनकर,डॉ.सुजित सोनवणे,आशिष कांबळे, शरद शिंगाडे, मिलिंद कोपरे, गौतम खरात, विजय वाघ, संदेश बाविस्कर, सुमित बिडवे, व एसटी महामंडळाचे चालक वाहक व कर्मचारी वृंद आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *