देवाभाऊंच्या मदतीने कोपरगाव पोलिसांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद :- स्नेहलताताई कोल्हे…

Uncategorized

राज्यभर पोलिस ठाणे आणि निवासस्थानाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्यामुळे मार्गी : राधाकृष्ण विखे पाटील…

कोपरगाव तालुका पोलिस ठाणे इमारत आणि 64 पोलिस कर्मचारी निवासस्थानाचे उद्घाटन…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुका पोलिस ठाणे इमारत आणि 64 पोलिस कर्मचारी निवासस्थानाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले.यावेळी मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रसंगी बोलताना स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या या वास्तूचे उद्घाटन होणे हा आनंदाचा क्षण ठरला.शहर आणि ग्रामीण पोलिस ठाणे वेगळे झाले.इमारती अतिशय दुरावस्था झाली होती त्यामुळे पोलिस अधिकारी कर्मचारी यांची गैरसोय होत होती. गैरसोय दूर करावी यासाठी पाठपुरावा सुरू केला.तत्कालीन गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहराज्यमंत्री आणि तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.

ग्रामीण आणि शहर पोलिस स्टेशन वेगळे करून जनतेला सोयीस्कर सुविधा मिळाव्या यासाठी प्रयत्न केले.पोलिस कर्मचारी वसाहतीत गेल्यानंतर प्रत्यक्ष स्थिती पाहून मला विधानसभा सदस्य असताना वाईट वाटले व ही परिस्थिती मुख्यमंत्री देवाभाऊंना कळवली त्यानंतर त्यांनी या प्रश्नात लक्ष घालून नवीन इमारती आणि कर्मचारी वसाहत यासाठी मंजुरी देत या सुसज्ज इमारती उभ्या राहिल्या.स्व.शंकरराव कोल्हे साहेब हे ग्रामीण शहर पोलिस स्टेशन वेगळे झाल्यानंतर झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते अशी आठवण यावेळी स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केली.
यावेळी आ.आशुतोष काळे,पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, नगराध्यक्ष पराग संधान,पोलिस निरीक्षक ग्रामीण संदीप कोळी,शहर पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आदींसह पोलिस अधिकारी कर्मचारी,सहकार महर्षी कोल्हे कारखाना उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे व सर्व संचालक,भाजपा तालुकाध्यक्ष विशाल गोर्डे व पदाधिकारी यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्नेहलताताई कोल्हे यांनी सर्व पोलिस बांधवांना शुभेच्छा दिल्या.
1

  1. ↩︎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *