नैसर्गिक वैभवाच्या पडलेल्या विसराने भविष्यात महानगरी कोपरगावचे मोठ न भरून येणारे नुकसान होईल:- किशोर चोरगे जयहिंद विचार मंच…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
गोदावरी तिरावर बसलेलं महानगरी कोपरगावातील आपण अनेक माध्यमातुन कोपरगाव च्या ऐतिहासिक स्थळांबाबत ऐकलं वाचलं आणि काही पुरातन ऐतिहासिक स्थळांना भेट हि दिली असेन
आम्हाला लाभलेल्या आनेक वैभवातील एक वैभव आमची गोदावरी नदी हि आहे पण त्या वैभवाचा सर्वांना नागरीक प्रशासन सामाजिक कार्यकर्ता आणि राजकिय महोदय अगदी सर्वांनाच विसर पडला आहे
आज गोदावरी नदीची अवस्था फार बिकट स्थितीत आहे शहर ग्रामीण सर्वच स्थरातुन गटारीचे पाणी नदीला येऊन मिळतात काही लोक मृत व्यक्तीचे अंथरून पांघरून तसेच नित्य वापराचे कपडे नदीत आणुन फेकतात तर काही जण कचरा निर्मुल्य इ.अनेक बाबी गोदावरीत आणुन फेकता हि मनस्थिती आपण बदलली पाहिजे नशीबाने महानगरी कोपरगाव नदी तिरावर बसले आहे कळत नकळत अनेक किलोमीटरची गोदावरीची किनारपट्टी आपणाला लाभली आहे तिचा आपण फायदा न घेता गोदावरी नदीचे उपप्रवाह हि आपण बुजवले आहे हि मोठी चुक आपणा कडुन झाली आहे
वेळ बसुन राहत नाही आपण कोरोनातुन कधी ना कधी सुटका मिळवुच नैसर्गिक स्त्रोत आपण दुषित केल्याचं पातक भविष्यातील पिढीला भोगावे लागतील हे महासंकट आपणावर भविष्यात असेन नैसर्गिक स्रोत आपली धरोवर आहे तीच रक्षण संरक्षण करणं आपल आद्य कर्तव्य आहे
इथलं पाप इथंच फेडाव लागत तसं नैसर्गिक स्त्रोताच आपण केलेलं नुसकानरूपी महापाप आपल्या पुढील पिढीला भोगावे लागेन आणि अल्पशा आपण हि भोगतच आहोत कि १५/२५ दिवसाआड पाणी मिळवुन
एकसंघ पणे कोरोना संपल्यावर गोदावरी नदी स्वच्छता
गोदावरी बचाव मोहिम हाती घेण्यास हवी
आज आपल्या काही बाबी लक्षात येत नाही पण त्याचे विपरीत परिणाम भविष्यात भोगावेच लागतील
काल आज गोदावरी नदीचे खालील बाबीने अपरिमित नुकसान होत आहे
पाण्यासाठी भुगर्भात बोर मारणे,गटारीचे पाणी नदीत सोडणे नदीचे उपप्रवाह बंद करणे, नदीत कचरा टाकणे,नदीत मलमुत्र विसर्जन करणे,वाळु उपसा करणे,नदीच्या तटाची माती खंदुन वापरणे, किनारपट्टी अरूंद करणे,मेलेले प्राणी नदीत फेकणे,मृत व्यक्तीच्या अस्थी विसर्जन करणे मृत व्यक्तीचे रोजचे वापराचे कपडे नदीत फेकणे, देवी देवतांचे फोटो भग्न मुर्ती पुजेचे सामान इ.अनेक बाबी
नुसता काही काळ नदीला तात्विक कचरा काढणे अथवा आपण काही तुटपुंज्या उपाय योजनांनी नदी स्वच्छ करू शकत नाही त्याकरता नदी स्वच्छता या शब्दाचा काहीसा अर्थ व्यापक करून काम करावं लागेन अन्यथा नैसर्गिक वैभवाच्या पडलेल्या विसराने भविष्यात महानगरी कोपरगावचे मोठ न भरून येणारे नुकसान होईल ते कोणी एक दोन व्यक्ती किंवा अन्य भरू काढु शकत नाही हे काम सर्वांनी मिळुन आणि निस्वार्थ करावं लागेन‌ तशी मानसिकता आपली बनवावी लागेन व्हाट्सअप फेसबुक किंवा टिकटाॅक या माध्यमांच्या नादी युवक युवतींनी न लागता मध्यम वृध्द सर्व वयो गटातील लोकांनी गट तयार करून आठवड्याच्या वार नुसार टिम बनवुन वेळेचं नियोजन करत गोदावरी नदी स्वच्छ केली पाहिजे एकाच वेळेला कमीत कमी पन्नास लोकांच्या वीस ते चाळीस गटांनी वेगवेगळ्या सम अंतरातील भागात मोहिम राबवावी लागेन
तरच हे काम होऊ शकत आणि गोदावरी नदी स्वच्छ होऊ शकेल
( स्वच्छता )कराल तर तराल (वृक्ष) पेराल तर उगवेन (लेख)वाचाल तर वाचाल (पाणी)साठवाल तर साठेन

जयहिंद
मी तयार आहे
माझी नदी स्वच्छ करण्याची माझी जवाबदारी स्विकारायला आपल मत कळवा…
जयहिंद जय भारत
जय महाराष्ट्
जय महानगरी कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *