कोेपरगांव प्रतिनिधी:-
लोकशाहीर आण्णाभाउ साठे अल्पशिक्षीत असतांनाही त्यांनी समाजातील अनिश्ठ प्रथा मोडुन काढण्यांसाठी शाहिरी कलेच्या माध्यमांतुन मोठे काम करत जनसामान्यांच्या दारात लोककला जीवंत ठेवली असे प्रतिपादन भाजपा अनुसुचित जाती मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष व शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनोद राक्षे यांनी केले. अध्यक्षस्थानी गटनेते रविंद्र पाठक व उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे होते. लोकशाहिरांनी 35 कादंब-या, 15 लघुकथा, 12 पटकथा, पोवाडा शैलीतील 10 गाणे लिहुन हा साहित्य प्रवास साता-समुद्रापार केला आहे असेही राक्षे म्हणांले.
कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पक्ष तसेच विविध आघाडया व सेलच्यावतींने पक्ष कार्यालयात लोकशाहिर आण्णाभाउ साठे पुण्यतिथी निमीत्त प्रतिमा पुजन करून त्यांच्या स्मृतीस वंदन केले त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी शहराध्यक्ष डी आर काले व संजीवनी बॅन्केचे संचालक राजेंद्र बागुल प्रास्तविक करतांना म्हणांले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी शहर प्रवेशाच्या उंबरठयावरच लोकशाहिर साठेंच्या स्मृती पुतळयाच्या माध्यमातुन जीवंत ठेवल्या आहेत त्याच्या सुशोभीकरणांसाठी तत्कालीन नगराध्यक्षा सुरेखा राक्षे, राजेंद्र सोनवणे, आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवकांनी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गददर्शनांखाली मोठे काम केले आहे. याप्रसंगी सर्वश्री सोमनाथ म्हस्के, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस कैलास खैरे, संजय तुपसैंदर, वैभव गिरमे, शंकर बि-हाडे, सुजल चंदनशीव, गोपि गायकवाड, खालीक कुरेशी, सतिश रानोडे, दिपक जपे, फकिर महंमद पहिलवान, संजय खरोटे यांच्यासह विविध सेल व आघाडयांचे अध्यक्ष उपाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी माजी नगरसेवक जयवंत मरसाळे यांनी आभार मानले.

फोटोओळी-कोपरगांव- कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पक्ष तसेच विविध आघाडया व सेलच्यावतींने पक्ष कार्यालयात लोकशाहिर आण्णाभाउ साठे पुण्यतिथी निमीत्त प्रतिमा पुजन करून त्यांच्या स्मृतीस वंदन करण्यांत आले.
