कोपरगाव शहर पोलीस स्टेशनची मोठी कारवाई मोटार सायकल चोरी करणारे ४ चोर अटक करून त्यांच्या कडून चोरी गेलेल्या ३ मोटार सायकल जप्त…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ११९/२०२३ भादवी क. ३७९.३४ प्रमाणे गुन्हा दि. ११/०३/२०२३ रोजी दाखल होता. सदर गुन्हयात १२०००रू. किंमतीची हिरो होंडा कंपणीची सि.डी.डॉन मो.सा. क्र. एम. एच. ४१/७७०५ ही मो. सायकल अज्ञात चोरांनी संजय नगर जोउर कुंभारी ता कोपरगाव येथून चोरून नेली होती. सदर आरोपींचा कोपरगाव शहर पोलीस स्टेशन च्या अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी कसून शोध घेतला असता सदर गुन्हयातील मो. सायकल चोरी करणारे आरोपी नामे १) महेश अन्नासाहेब गायकवाड रा. शनिमंदिर रोड राहता ता. राहता २) निलेश दिलीप जाधव रा शनि चौक राहता ता राहता ३) किरण चंद्रकांत जाधव रा संजय नगर जोउर कुंभारी ता कोपरगाव ४) सोमनाथ किसन वरशिळ रा संजय नगर जोउर कुंभारी ता कोपरगाव यांचा शोध घेवून त्यांची पोलीस तपासात कसून चौकशी करून सदर आरोपी मजकूर यांच्या कडून गुन्हयात चोरी गेलेली मोटर सायकल हस्तगत करण्यात आली आहे. तसेच सदर आरोपी मजकूर यांनी लोणी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १४०/२०२३ भादवी क. ३७९ प्रमाणे गुन्हयातील मोटर सायकल चोरी केले बाबत कबूली दिल्याने सदर मोटर सायकल कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आली आहे. तसेच सदर आरोपी मजकूर यांच्या ताब्यातून बजाज कंपणीची प्लॅटीना मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रमाणे वरील चार आरोपी कडून एकुन ०३ मोटर सायकल जप्त करण्यात आल्या असुन सदची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक राकेश ओला सो, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव सो. शिर्डी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोलीस उपनि. रोहीदास ठोंबरे पोलीस उपनिरी. भरत दाते, पोलीस उपनिरी. संजय पवार, पोहेकॉ/ किशोर जाधव, पोना/ अर्जुन दारकुंडे, पोना/महेश गोडसे, पोकॉ/ गणेश थोरात, पोकों/संभाजी शिंदे, पोकों/गणेश काकडे, पोकॉ/राम खारतोडे, पोकॉ/यमनाजी सुंबे, पोकॉ/महेश फड सर्व नेम कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या पथकाने केलेली आहे…….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *