आयुष्य असंही असतं:- गोरेसर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
क्षण प्रवाहाशून्य होऊन त्यावर उदास शेवाळ साठतंय हे लक्षात येण्याइतकं आपण सावध असायला हवे . त्या वेळी मोबाइल सुरू करून एखादं उसळतं गाणं घुमवण्याची तयारी हवी . टीव्हीवर ‘ डिस्कव्हरी मधील एखादं थरारक दृश्य बघून ” आयुष्य असंही असतं हे बघून उत्साहाचे दबलेल कारंज उसळून येईल . एकटे आहोत …. करमत नाही … अशा क्षणी दोन – चार जुने आल्बम काढून आठवणीच्या जगात हरवून जाता येईल . पुलंच्या पुस्तकांचं पुन्हा पारायण करता येईल . ‘ अपूर्वाई’च्या स्मित झुळकेन मनाचा शीण उडूनही जाईल . इंदिरा संतांची ‘ मेंदी शेला’सोबतीस घ्यावाशी वाटिल . न बंद दारातून हक्काची मैत्रीण गुणगुणत येईल … ‘ मातीतून मी आले वरती , मातीचे मम अधुरे जीवन..!!

अक्षरलेखन गोरे सर… 9850613612

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *