कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्याच्या राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोपरगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरिता नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी उमेदवाराकरीता आरक्षण नुकतेच जाहीर झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला तर आज बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी ११.३० वाजता सायली सोळंके निवासी उपजिल्हाधिकारी भुसंपादन विभाग अहिल्यानगर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सुहास जगताप प्रशासक तथा मुख्याधिकारी कोपरगाव नगर परिषदेच तसेच अश्विनी पिंगळ सहाय्यक रचनाकार किरण जोशी सहाय्यक रचना विभाग रश्मी प्रधान रचना सहाय्यक मनोज कुमार पापडीवाल कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये १५ प्रभागातील नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील १५ प्रभागातून प्रत्येक प्रभागात दोन सदस्य असे ३० सदस्य असणार आहे यामध्ये प्रभाग क्रमांक १ अ) जनरल (महिला) ब) जनरल प्रभाग क्रमांक २ अ) अनुसूचित जाती
ब) जनरल (महिला) प्रभाग क्रमांक ३ अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)ब) जनरल प्रभाग क्रमांक ४ अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ब) जनरल
प्रभाग क्रमांक ५ 
अ) अनुसूचित जमाती
ब) जनरल (महिला) प्रभाग क्रमांक ६ अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला) ब) जनरल प्रभाग क्रमांक ७ अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब) जनरल (महिला) प्रभाग क्रमांक ८ अ) अनुसूचित जाती (महिला) ब) जनरल प्रभाग क्रमांक ९ अ) अनुसूचित जाती  ब)
जनरल(महिला) प्रभाग क्रमांक १० अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग ब) जनरल (महिला) प्रभाग क्रमांक ११
अ) अनुसूचित जाती (महिला)
ब) खुला प्रभाग क्रमांक १२ 
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ब) जनरल प्रभाग क्रमांक १३ अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ब) जनरल ( महिला) प्रभाग क्रमांक १४ अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ब) जनरल (महिला) प्रभाग क्रमांक १५ अ) अनुसूचित जाती (महिला)ब) जनरल या नुसार आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तर जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण वर हरकती व सूचना ९ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सूचना अथवा हरकती सादर कराव्यात असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.

चौकट -कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणूक २०२५ मध्ये १३ जागा महिलांसाठी जाहीर झाल्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *