
कोपरगाव प्रतिनिधी:-
कर्मयोगी आणि संजीवनी उद्योग समूहाचे भाग्यविधाते स्व. शंकरराव कोल्हे साहेब , पिताश्री,पुणे विद्यापीठात विधी क्षेत्रात सुवर्णपदक प्राप्त कर्ते आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना माजी अध्यक्ष ॲड स्व. संपतराव कडू पाटील यांच्या सामाजिक सेवेच्या बावनकशी मुशीत तावून सुलाखून निघालेल्या व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष पती बिपीन दादा कोल्हे, सुपुत्र व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे साहेब यांची खंबीर साथ आणि श्रीमती सिंधू माई यांच्या प्रेमळ मायेच्या सावलीत सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळतांना जीवनातील अगणित समस्यांचे डोंगरांच्या कडे कपारी यशस्वी रित्या लिलया चापल्यतेने पायदळी तुडवतांना भाजप प्रदेश सचिव आणि माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे वहिनी आपल्या जीवनात यशस्वी ठरल्या आहेत.
आपल्या परिसरातील मजूर , ग्रामीण कारभारीण, गृहिणी , सर्व वयोगटातील महिलांशी मनमोकळ्या गप्पा मारताना आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आरोग्य, शिक्षण समस्या जाणून घेतल्या. यावर बिपिन दादा व कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांच्यापुढे मांडल्यावर दोघांनी त्यांना महिलांनी घरगुती व्यवसाय केल्यास भांडवल पुरविण्याची हमी दिली यावर महिलांना संघटित करून बचतगटाची मुहूर्तमेढ रोवली. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात १२००वरील बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी २० हजार महिलांचे यशस्वी संघटन उभारले याच महिलांच्या संघटनेच्या बळावर महिलांनी त्यांना कोपरगांवच्या पहिल्या महिला आमदार बनविले. सौ.कोल्हे वहिनी साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली महिलांनी स्वतःची पक्कीघरे ,मुलामुलींना शिक्षण , मोठ्या खर्चातून शिक्षणासह गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या विवाह, कुटुंबीय सदस्यांना उत्तम व्यवसाय उभारण्यात महिला यशस्वी ठरल्या आहेत. यामुळे संपूर्ण देशात सर्वत्र शेतकरी कामगार ,नागरीक आत्महत्यांचे दररोज विक्रम घडत असतांना कोपरगांव तालुका कायम अपवाद ठरला आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिला बचत गटाच्या माध्यमातून स्थानिक रोजगार निर्मिती, उद्योग बाजारपेठ विकसित झाल्यानें पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी यांचे महिलां विकासबाबत चे स्वावलंबीआत्मनिर्भर भारतचे स्वप्न केंव्हाच साकार झाले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक कोरोना प्राणघातक महामारी साथीत स्वत:,पती बिपीन दादा व सुपुत्र विवेक भैय्या कोल्हे मृत्यूच्या दाढेत जीवन संघर्ष करीत असतांनाच परिसरातील नागरीकांच्या कुटुंबियांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सर्वप्रकारे खंबीर आधार दिल्याने हजारों कुटुंबे बावरली गेली आहेत.
अशा देशसेवक महिलेस सविन्रम अभिवादन!! तसेच सौ. कोल्हे वहिनी साहेब आणि कोल्हे कुटुंबियांना परमेश्वराने भविष्यात कायमस्वरूपी सुखसमृद्धीचे , उत्तम आरोग्य देवून त्यांच्या हातून सर्वोच्च देशसेवा घडविण्यासाठी सर्व जीवन संघर्षात बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!! —
जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव–
