वारीत टेके पाटील ट्रस्टच्यावतीने वृक्ष लागवड ,पर्यावरण संवर्धन ; गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचा सहभाग…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी: तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, व गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वारी येथे नुकतीच एक वटवृक्ष व दहा बांबू वृक्षांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, उप कृषी अधिकारी सुनील गावित, मंडळ कृषी अधिकारी अपूर्वा वामन, वारीच्या कृषी सहाय्यक मनीषा पांगरेकर, सडे येथील कृषी सहाय्यक एस.जी. तमनर, वारीचे ग्रामपंचायत अधिकारी संग्राम बोर्डे, गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, बाजार समितीचे संचालक प्रकाश गोर्डे, बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके, माजी ग्रा.पं. सदस्य मधुकर टेके, ट्रस्टचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके, माजी उपसरपंच दिवाकर निळे, वारी सेवा संस्थेचे चेअरमन नवनाथ जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य गोरख टेके, ह.भ.प.डॉ. सर्जेराव महाराज टेके,ह.भ.प. विनायक महाराज टेके, वाल्मीक जाधव, राजेंद्र काजळे, संदीप काजळे, संदीप भाकरे, व्यंकटराव धट, मंगेश सिनगर, अनिल भाटी, मच्छिंद्र गांगड, राजेंद्र टेके, संजय टेके, साहेबराव टेके, दिलीप टेके, भाऊसाहेब टेके, संजय थोरात, अनिल गोरे, उमाकांत टेके, योगेश झाल्टे, साहेबराव टेके, अजीम शेख, बाबासाहेब थोरमिसे, नाना गाडगे, सुकृत गोर्डे, विशाल टेके, रवींद्र टेके, सुधाकर ठोंबरे, महेश टेके, गोरख जगताप, मच्छिंद्र टेके, अशोक गोरे, नानासाहेब गोर्डे, शिवाजी टेके, छबुराव चव्हाणके, अशोक मलिक, गणेश मलिक, नंदू जाधव, वेडू मोकळ, विकास शिंदे, सुनील गोर्डे, विजय काळे, सुरज टेके, स्वप्निल टेके, मंगेश आदमने, विकास टेके, श्रीरंग गिरे, वाल्मीक चव्हाण, रितेश सोनवणे, विलास गोंडे, शंकर गोंडे, कोंडीराम मंचरे, उत्तम वाकचौरे, दीपक झाल्टे, विनायक सिनगर, दादासाहेब सिनगर, कल्याण टेके, आकाश टेके, अक्षय टेके, पुरुषोत्तम टेके, शुभम टेके, चेतन निळे बाबासाहेब थोरमिसे, विकास बिरुटे, गोपी जगताप, अविनाश बारसे, राजवर्धन टेके,जयवर्धन टेके यांच्यासह वारी तसेच कान्हेगाव, सडे, भोजडे, धोत्रे, बापतारा पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चार वर्षापासून सातत्यपूर्ण वृक्ष लागवड.

टेके पाटील ट्रस्टच्या वतीने गेल्या चार वर्षापासून वारी परिसरातील सार्वजनिक परिसरात, शाळा, महाविद्यालय या ठिकाणी वटवृक्ष, पिंपळ, कडुलिंब, आंबा, पेरू, आवळा, चिंच, चिकू, जांभूळ, अशोक वृक्ष, बांबू यांची लागवड करून वृक्षांचे संगोपन करण्यात येत आहे. आजवर लागवड केलेली सर्वच झाडे सुस्थितीत असून पर्यावरण संवर्धनासाठी ट्रस्टचे कार्य सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *