
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज शिर्डी येथे राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे साई संस्थानच्या सुपर हॉस्पिटल मध्ये प्लाझ्मा दान मशीन सुरू करणे बाबत निवेदन दिले

कोरोना महामारी ने सर्व त्रस्त असताना प्लाझ्मा हे जीवनदान ठरत आहे तरी शिर्डी,राहता,कोपरगाव,संगमनेर,श्रीरामपूर उत्तर अहमदनगर जिल्ह्यात प्लाझ्मा दान करण्यासाठी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना तो मिळवण्यासाठीअ.नगर,नाशिक,पुणे येथे जावे लागते सदर गोष्टीचा विचार करता शिर्डी येथे संस्थान चे सुपर स्पेशालिटी रुग्णालय असून तेथे प्लाझ्मा डोनेशन मशीन देखील आहे,काही कारणास्तव परवानग्या अभावी ते बंद आहे तरी सदर मशीन सुरू झाल्यास अनेक गरजू रुग्ण या पासून लाभ घेतील व कोरोना मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण यामुळे घटेल,तरी सदर गोष्टींचा आढावा घेऊन प्लाझ्मा मशीन कार्यरत करण्याच्या सूचना द्याव्या ही नम्र विनंती केली साहेबांनी दखल घेत संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांना सूचना देऊन सदर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

यावेळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे,शिर्डी चे प्रांत गोविंद शिंदे तसेच उपमुख्य कार्यधिकारी रवींद्र ठाकरे उपास्थित होते.
तुषार पोटे,
उपाध्यक्ष,
अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस…
