लहान मुलांमध्ये कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कोपरगांव तालुक्यातील सरकारी वैद्यकिय अधिकारी आणि खाजगी डॉक्टर यांचे प्रशिक्षण:- तहसीलदार योगेशजी चंद्रे…

कोपरगाव

चिमुकल्यांचे स्मित हास्य जपत कोरोणाला हरवू या:- बालरोग तज्ञ डॉ.उज्वला शिरसाठ-ढाकणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-
लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्नशील राहून संसर्ग बाधितांवर शास्त्रोक्त उपचार करत चिमुकल्यांचे स्मित हास्य जपत कोरोणाला हरवू या.असे आवाहन बालरोग तज्ज्ञ डॉ.उज्वला शिरसाठ-ढाकणे यांनी व्यक्त केले.
कोपरगाव तालुक्यातील बालकांमध्ये होणारा कोरोना संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी तहसिलदार योगेश चंद्रे, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे(आव्हाड), तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ज्ञ,टास्क फोर्सचे सदस्य, समुदाय आरोग्य अधिकारी यांचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

नासिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले, निवासी जिल्हाधिकारी संदिप निचित, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली लहान मुलांमध्ये होणारा कोरोना संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात संदर्भात तालुका पातळीवर नियोजन करण्यासंदर्भात कळवले आहे.त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच कोपरगाव तालुक्यात या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

तहसिलदार योगेश चंद्रे यांचे दालनात डॉ.उज्वला शिरसाठ-ढाकणे यांनी चलचित्र फितीचा वापर करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी तहसिलदार योगेश चंद्रे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे(आव्हाड), ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर, बालरोग टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ.अजेय गर्जे, डॉ.मयुर जोर्वेकर, डॉ.आतिष काळे, डॉ.शंतनू सरवार, डॉ.प्रियंका मुळे,शहरी आरोग्य अभियानच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.गायत्री कांडेकर(आहेर), डॉ.पुजा बोर्डे, डॉ.विकास घोलप, डॉ.साहिल खोत, डॉ.नितीन बडदे, डॉ.सुजित सोनवणे, डॉ.आसेफा पठाण, डॉ.वरद गर्जे, डॉ.कुणाल घायतडकर, डॉ.कृष्णाजी पवार,डॉ.अरुणा गाताडे,डॉ.सुवर्णा काळे, डॉ.वर्षा लिंपणे, डॉ.संजिवनी तोडकर, डॉ.संकेत पोटे, डॉ.आदित्य पाटील, डॉ.आयुब शेख, डॉ.सुधीर वाणी, डॉ.नेहा वाघमारे, डॉ.बाळासाहेब आडसरे, डॉ.संतोष तिरमखे यांचे सह समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

तहसिलदार योगेश चंद्रे यांनी कार्यशाळेच्या मार्गदर्शिका बालरोग तज्ज्ञ डॉ.उज्वला शिरसाठ(ढाकणे) व सहभागी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी तर टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉ.अजेय गर्जे यांनी मनोगत व्यक्त केले.तर आभार विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाल ‌बडदे यांनी मानले.तर सुत्रसंचलन समन्वयक सुशांत घोडके यांनी केले.

सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यशाळेत लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी.कोरोना संसर्ग झालेल्या बालकांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) आणि महाराष्ट्र टास्क फोर्स यांनी सुचित केलेली प्रचलित उपचार पध्दती, लहान मुलांचे पालकांमध्ये समुपदेशन,मुले योग्य काळजी घेवून आनंदी राहण्यासाठी पालक आणि कुटुंबियांनी करावयाच्या उपाययोजना संदर्भात माहिती सांगितली.
बालकांमध्ये कोरोंना संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाचा सदुपयोग होईल असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केला.पालकांनी घाबरून न जाता योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.”कोरोनाला हरवू या चिमुकल्यांचे स्मित हास्य जपवू या.” हा संकल्प उपस्थितांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *