
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा आणि वैद्यकीय मदत मिळण्यासाठी कोपरगाव कोरोना वॉर रूम ची स्थापना केली असून त्यामाध्यमातून रुग्णांना बेड मिळवून देणे, ऑक्सिजन सुविधा, रेमडीसेवर, रुग्णवाहिका मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे समन्वय साधने अश्या प्रकारची कामे ह्या वॉर रूम मधून होत असतात. कोपरगावातीलच सुशिक्षित,सर्वपक्षीय तसेच सर्व विचारधारेच्या युवकांनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या ह्या उपक्रमाला भेट देण्यासाठी आज तालुक्याचे आमदार आशुतोष काळे तसेच भाजपाचे युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांनी भेट दिली.सदरील वॉर रूमची संपूर्ण राज्यभरात चर्चा सुरू असून कौतुकास्पद काम येथील सर्व स्वयंसेवक करत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच आज मान्यवरांनी भेटी दिल्या.दरम्यान कोणत्याही साधन,सुविधेची आवश्यकता भासल्यास त्याची पूर्तता करून देतो असा शब्द आमदार काळे यांनी दिला तर वॉर रूम करिता कोणतीही मदत हवी असल्यास ती पुरवण्यात येणार असल्याचे आश्वासन विवेक भैय्या कोल्हे यांनी वॉर रूमचे मुख्य समन्वयक तुषार पोटे यांना दिले आहे.अश्या अभ्यासू आणि संवेदनशील युवा नेत्यांच्या भेटीमुळे वॉर रूमच्या सर्व आरोग्य सेवकांना काम करायला अजून ऊर्जा मिळाली असल्याचे सर्व आरोग्य सेवकांचे मत आहे.
कोपरगाव कोरोना वॉर रूम…
मदत नव्हे कर्तव्य..!!
