कोपरगाव तालुक्यातील दररोज चे लसीकरण वेळापत्रक जाहीर करावे; जनतेची नम्र विनंती:- राजेंद्र भवर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
सध्या कोपरगाव तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रातुन व कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरु झालेले आहे.
परंतु कोणत्या केंद्रात कोणत्या वयोगटातील,कोणते लसीकरण व कधी सुरु आहे याची माहिती जनतेला होत नसल्यामुळे सामान्य नागरिक व तरुण वर्ग सुशिक्षित असुनही प्रत्यक्ष लसीकरण ठिकाणी गेल्या शिवाय माहिती होत नाही व इच्छा नसतानाही केवळ लसीकरण करुन घेण्यासाठी जनता कर्फ्युचा सरकारी नियम मोडुन भर उन्हात आणि भल्या पहाटेच जेष्ठ नागरिकांना रांगेत उभे रहावे लागते आणि पदरी निराशा घेऊन पुन्हा पुन्हा हाच उपद्व्याप करावा लागतो.
यात तालुका आरोग्य विभाग व शहर प्रशासन यांत समन्वय करुन संपुर्ण तालुक्यातील दररोज चे लसीकरण वेळापत्रक जाहीर करावे.व प्रसिद्धी माध्यमातून सुद्धा नकारात्मक बातम्यांपेक्षा ही गरजेची माहीती तालुक्यातील जनतेसमोर मांडावी ही संपुर्ण तालुक्यातील जनतेच्या वतीने कोपरगाव तालुका प्रशासनास नम्र विनंती…
राजेंद्र भवर,कोपरगाव
मो.7588021911

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *