पंजाबी समाजाचे आधारस्तंभ व पूर्ण समाजाने ज्यांना गुरु मानले,असे स्व.ऐ.जी लोंगाणी (सी.ए) यांचे दुःखद निधन ,भावपूर्ण श्रद्धांजली:- नारायणशेठ अग्रवाल…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
पंजाबी समाजाचे आधारस्तंभ व पूर्ण समाजाने ज्यांना गुरु मानले,असे स्व.ऐ.जी लोंगाणी (सी.ए) यांचे दुःखद निधन झाले.भावपूर्ण श्रद्धांजली
कोपरगावातील पहिले “चार्टर्ड अकाउंटंट” म्हणून त्यांना कोपरगाव उद्योग जगात मानाचे स्थान होते. अकाउंटिंग,टॅक्सेशन आणि ऑडिट या क्षेत्रात त्यांनी नेत्र दीपक प्रगती केली. लहान व्यापाऱ्यांपासून मोठ्या उद्योगपती पर्यंत शिर्डी येथील हॉटेल व्यवसायिक यांना ते टॅक्सेशन बाबत मोलाचा सल्ला देत.
आज कोपरगाव झालेल्या उद्योग क्षेत्रातील प्रगती यात स्व.ऐ.जी लोंगाणी यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या व्यावसायिक क्षेत्राबरोबरच सामाजिक व शैक्षणिक धार्मिक खूप मोठे कार्य केले आहे. सुमारे 20-25 वर्ष के.जे सोमय्या कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून अकाउंटिंगचे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. विद्यार्थ्यांना व्यवहारिक जगाची ओळख,पोस्टर प्रेझेंटेशन,केस स्टडीज,व्यावसायिक नीती मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडले. कोणीही व्यावसायिक मार्गदर्शनाकरता त्यांच्याकडे आल्यावर ते मोलाचं आणि निरपेक्ष मार्गदर्शन करीत.
कोपरगाव पंचक्रोशीतील पंजाबी समाज यांना गुरु मानत त्यांच्या समाजाची पवित्र वस्तू “जाम साहेब” ही त्यांच्या निवासस्थानी उपलब्ध होती व आहे. पंजाबी समाजात कोणत्याही शुभ कार्य करताना, या वस्तूचे दर्शन घ्यावे लागते. दिल्लीतील सर्वोच्च गुरुनी हे “जाम साहेब” पूर्ण महाराष्ट्रात लोंगाणी यांना दिले. स्व.ऐ.जी लोंगाणी यांच्या जीवनात सर्वात मोठे व महत्त्वाचे कार्य म्हणजे भव्य दिव्य राम मंदिराची कोपरगावात निर्मिती केली. त्यांच्या समाजाव्यतिरिक्त इतर समाजाची सुद्धा या मंदिरात नेहमीच गर्दी असते. त्या मंदिराचे सर्व धार्मिक विधी कार्य ते आज पर्यंत पहात होते. या राम मंदिर वरूनच त्या रोडला “राम मंदिर रोड” हे नाव पडले. ते आजही राम मंदिर रोड संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. स्व.ऐ.जी लोंगाणी यांच्या निधनानंतर त्यांनी केलेले कार्य हे सर्वसामान्य जनतेच्या मनात कायम राहील,यात शंका नाही. पुढेही व्यापारी कराच्या बाबतीत काही गुंतागुंत झाल्यास सरांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. अशा अष्टपैलू एक महान गुरू,व्यावसायिक,मार्गदर्शक,धार्मिक गुरू,एक कुटुंब वत्सल माणूस म्हणून कोपरगावातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…!
त्यांचे सुपुत्र डॉक्टर.केदारनाथ लोंगाणी (होमिओपॅथिक) व वेदप्रकाश लोंगाणी (आर्किटेक )हे सुद्धा आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून समाजसेवा करीत आहे.
त्यांच्या धर्मपत्नी जीत (भाभी) या जीत चाची म्हणून कोपरगाव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यांचे सुद्धा स्व.ऐ.जी लोंगाणी यांच्या कार्यात मोठा सहभाग होता. त्याच्या सहकार्यानेच स्व.ऐ.जी लोंगाणी एवढ मोठ कार्य करू शकले.
त्यांच्या जाण्याने कोपरगाव व्यावसायिक जगतात एक पोकळी निर्माण झाली आहे. अशा महान आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *