
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षपदी सांगवी भुसार येथील प्रगतीशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते श्री.तानाजी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या पक्षनिष्ठा आणि कार्यक्षमतेचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.
तानाजी जाधव हे पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असून, त्यांनी स्थानिक पातळीवर तसेच ग्रामीण भागात पक्षाची विचारधारा आणि कार्यक्रमांना बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
त्यांच्यावरील या नव्या जबाबदारीमुळे तालुक्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास नियुक्ती पत्र देताना राज्य प्रवक्ते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ऍड. संदीप वर्पे यांनी व्यक्त केला आहे. नेतृत्वाला आहे.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल जिल्हा प्रभारी व माजी आमदार अशोकबापू पवार,
खासदार निलेशजी लंके, आमदार रोहितदादा पवार, माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
नियुक्तीनंतर तानाजी जाधव म्हणाले, “पक्षाने माझ्यावर सोपवलेली ही जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडीन. तालुक्यातील जनतेच्या हितासाठी आणि पक्षाच्या ध्येयधोरणांना गती देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
