अहमदनगर जिल्ह्या मधील कोविड-19 रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन बेड मोफत उपलब्ध करण्यात यावे:- वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष शरद खरात…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
अहमदनगर जिल्ह्या मधील कोविड-19 रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन बेड मोफत उपलब्ध करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे मा.जिल्हाध्यक्ष शरद खरात यांनी केली.
अहमदनगर जिल्ह्यात कोविड-19 चे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे व पाहिजे त्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे गरीब जनतेचे खूप हाल होत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन चा तुटवडा असून काळाबाजार जोरात सुरू आहे व अत्यावश्यक ऑक्सिजन सुद्धा उपलब्ध होत नाही, ज्यामुळे रुग्ण दगावत आहेत.

तसेच कोपरगाव शहरामध्ये फक्त दोनच ठिकाणी शिवभोजन थाळी चालू आहे, दोन्ही मिळून 225 थाळीच उपलब्ध आहे तरी कोपरगाव चा लॉकडाउन चालु होऊन एक माहीना झाला आहे, लोकांच्या हाताला काम नाही रोजगार नसल्यामुळे गरजू व गरीब लोकांचे एक टाईम खाण्याचे वांदे झाले आहे तरी शिवभोजन थाळीचे केंद्र वाढून संख्या वाढवावी.

तसेच राज्य सरकारने घोषणा केल्या प्रमाणे स्वस्त धान्य दुकानात अन्न धान्य त्वरित वाटप करावे कारण मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना चालू आहे. कारण असंख्य मुस्लिम बांधवांचे हातावर पोट आहे,व बांध काम मजूर तसेच परवाना धारक रिक्षा चालक यांच्या खात्यावर ही त्वरित 1500/- रुपये टाकावे.

अन्यथा येणाऱ्या काही दिवसात अहमदनगर चे पालक मंत्री ना.हासन मुश्रीफ साहेब यांना कोपरगावत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घेराव घालण्यात येईल अशी माहिती मा.जिल्हाअध्यक्ष शरद खरात प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *