
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी येथे शिवजयंती, मराठी राजभाषा दिन व विज्ञान दिन. साजरा करण्यात आला.
यावेळी प्रख्यात व्याख्याते मा. श्री गौरव पवार सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट विद्यार्थ्यांपुढे सादर केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य श्री बारे एन. जी. उपस्थित होते त्यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. ढेकळे, प्रा. रणधीर, प्रा. कहार, प्रा. वैराळ, श्रीमती. शेलार, श्रीमती म्हस्के, श्रीमती जाधव. उपस्थित होते.
शिव व्याख्याते प्राध्यापक गौरव पवार सर यांनी “छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे व आदर्श समाज घडवावा.” असे प्रतिपादन केले.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री बारे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की “मराठी भाषेला अभिजात राजभाषा म्हणून दर्जा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मराठी भाषा जोपासावी तसेच विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करणे काळाची गरज आहे. आपले आई-वडील हेच आपले दैवत आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी अभ्यास रुपी शस्त्र वापरून स्वतःची उन्नती साधावी” असे मनोगत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
” विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करून आपले जीवन उज्वल बनवावे” असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा.रणधीर यांनी मानले.
