
कोपरगाव प्रतिनिधी:-
Covid-19 नियंत्रणासाठी कोपरगाव तालुक्यात दिनांक 28 एप्रिल 2021 ते 02 मे 2021 या कालावधीत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत कुटुंबाचे सर्वेक्षण चालु झाले असून जनतेने सर्वेक्षण करणाऱ्या पथकाद्वारे आरोग्य तपासणी करून शासनाला सहकार्य करावे. सदर सर्वेक्षण पथकात एक आशा स्वयंसेविका, एक अंगणवाडी सेविका मदतनीस, एक जिल्हा परिषद शिक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे. हे पथक दररोज पन्नास घरांना भेटी देणार आहे. भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन पातळी ,पल्स रेट तसेच कोविड ची इतर लक्षणे तपासणार आहे .कविड संबंधी लक्षणे आढळल्यास सदर रुग्णांना कोविड टेस्ट करण्यासाठी शासकीय दवाखान्यात संदर्भित करून त्यांची कोविड टेस्ट करण्यात येईल.सदर मोहिमेत २३९ पथके तयार करण्यात आलेली आहेत.सर्वेक्षणामध्ये आज अखेर ३४०८६ कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले असून १६६५३२ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
तपासणी दरम्यान १०९४ व्यक्ती संशयित आढळून आलेल्या आहेत.त्यापैकी १६७ व्यक्ती कोविड
पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
डाॅ. संतोष विधाते
तालुका आरोग्य अधिकारी
पं स कोपरगाव.
