ऊसतोड मजुरांच्या चिमुकल्यांना उबदार कपड्यांचे वाटप , सामाजिक बांधिलकी : राहुल दादा टेके पाटील ट्रस्टचा उपक्रम…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी : तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने सालाबादप्रमाणे दोन दिवसीय उपक्रमात वारी ग्रामपंचायतचे दिवंगत सदस्य राहुल (दादा) टेके पाटील यांच्या स्मरणार्थ वारीतील परशुराम बाबा मंदिर परिसरातील व जगदंबा देवी मंदिर परिसरात वास्तव्यास असलेल्या कष्टकरी ऊसतोड मजुरांच्या शंभरपेक्षा जास्त चिमुकल्यांना कडाक्याच्या थंडीत त्यांच्या फडात जाऊन उबदार कपड्यांचे (कानटोपी) सामाजिक बांधिलकीतून नुकतेच वाटप करण्यात आले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके म्हणाले, राहुल दादांचे सामाजिक कार्य खूप मोठे होते. समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची नेहमीच तळमळ असायची परंतु, कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत राहुल दादांना आपल्यापासून हिरावून नेले. मात्र, सामाजिक कार्यातून त्यांच्या स्मृती चिरंतर राहाव्यात यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. सद्या कडाक्याची थंडी वाढली आहे. त्यामुळे चिमुकल्यापासून वयोवृद्धपर्यंत सर्वांना हुडहुडी भरली आहे. अशातच उघड्यावर प्रपंच असलेल्या कष्टकरी ऊसतोड मजुरांच्या चिमुकल्यांना उब देण्याच्या धडपडीतून हा सामाजिक तितकाच भावनिक उपक्रम राबविण्यात आला. लवकरच या ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ट्रस्टमार्फत प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही टेके यांनी म्हटले आहे. यावेळी जगदंबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे, हभप विनायक महाराज टेके, हभप डॉ. सर्जेराव महाराज टेके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जगदंबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे, हभप विनायक महाराज टेके, हभप डॉ. सर्जेराव महाराज टेके, हभप मच्छिंद्र टेके महाराज, मदन काबरा, रवींद्र टेके, संजय कवाडे, हभप डॉ. सर्जेराव टेके महाराज, गणेश भाटी, जयसिंग बनगया, भाऊसाहेब टेके, उत्तम वाकचौरे, भीमा आहेर, हुसेन शेख, गणेश गोर्डे, राजेंद्र मुरार, विलास गोंडे, विजय ठाकरे, योगेश झाल्टे, दीपक झाल्टे, मधुकर सोनवणे, अजीम शेख, अशोक निळे, सुरज टेके, स्वप्नील टेके, प्रशांत टेके, बाजीराव गोंडे, पिनू तळेकर, शंकर धामणे, सुंदर पगारे, ऋषिकेश मलिक, ऋषिकेश गोर्डे, बबलू वाळके, आदित्य निळे, बबलू निळे, केतन भारुड, बुद्धभूषण निळे, महेश टेके, कृष्णा टेके, विकास बिरुटे, साहिल शेख, युनूस शेख, अभिजीत भगुरे, पिनू तळेकर, राहुल जाधव, प्रदीप पवार, दत्ता परस्सैया, ओम मैराळ, सचिन शिंदे, सनी जाधव, साई मैराळ, कृष्णा क्षीरसागर, यश भारुड, स्वप्निल गायकवाड, अमित झाल्टे, सक्षम आवारे, जय ठाकरे, राजवर्धन टेके, जयवर्धन टेके यांच्यासह ऊसतोड मजुरांचे कुटुंबीय तसेच चिमुकले मोठ्या संख्यने उपस्थित होते.

फोटोओळी –
वारी येथील ऊसतोड मजुरांच्या चिमुकल्यांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *