महिलादिनी राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरलादीदी यांनी केला नारीशक्तीचा सन्मान…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कोपरगाव येथे महिलादिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील महिलांचा पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमाचे कोपरगाव येथील प्रजापिता ब्राम्हकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय येथे राजयोगिनी ब्रह्माकुमारी सरला दीदी यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली
अध्यात्मिक तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये आणि व्यसनमुक्ती आशा सर्व क्षेत्रात सरला दिदींचे चांगले काम आहे सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेऊन महिलादिनी पुरस्कार देऊन सरलादीदी यांनी नारीशक्तीला बळ दिल्याचे माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगत त्यांचे कौतुक करुन उपस्थिताना शुभेच्छा दिल्या तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमात माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ चैतलीताई काळे ,सौ स्वातीताई कोयटे,पुंड ताई, शितल ताई यांचे सह विविध महिलांचा नारीशक्ती पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी ब्रम्हकुमारी चैताली दीदी,ब्रम्हकुमारी,रुचीदीदी बहुल , ब्रम्हकुमारीज्योतीदीदी,ब्राम्हकुमारी, शितल दीदी,मनीषा दीदी यांचेसह महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत सहभाग नोंदवला सरला दीदी यांनी आशीर्वाद देत सर्व उपस्थितांचे आभार मानले या उपक्रमा मुळे ब्राम्हकुमारी सेवा केंद्राचे सर्वत्र कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *