श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते आज होणार गोदा आरती ; एकूण ६१ आरत्या होणार; ५० हजाराहून अधिक भाविकांची असणार उपस्थिती…

Uncategorized

(नाशिक):–रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना गोदाआरतीसाठी निमंत्रित करण्यात आले असून आज (दि.१५ जानेवारी) रोजी सायंकाळी ६.३० वाजता गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते आरती करण्यात येणार आहे. तसेच एकूण ६१ आरत्या या निमित्ताने होणार आहे अशी माहिती रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनी दिली आहे.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने नियमित गोदा आरती करण्यात येते. तसेच विविध उपक्रम देखील राबविण्यात येत असतात. समितीच्या वतीने गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना गोदावरी आरती निमंत्रित करण्यात आले असून आज सायंकाळी ६.३० वाजता त्यांच्या हस्ते गोदावरी आरती करण्यात येणार आहे. यावेळी ६१ आरत्या होणार असून पन्नास हजाराहून अधिक भाविक या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी यावेळी सहभागी व्हावे असे चिराग पाटील योग गुरु व सदस्य रामतीर्थ गोदावारी समिती यांनी आव्हान केले आहे व रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *