अनुभवाचा समृद्ध झरा असलेले हे व्यक्तिमत्त्व आपल्यात नाही माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना भावपूर्ण श्रद्धांजली:- देवेंद्र फडणवीस…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
सहकारातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सहकार-शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य आहे. पाण्याचे प्रश्न ते अतिशय पोटतिडकीने मांडत.
ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणासाठी शैक्षणिक संस्थांचे जाळे त्यांनी उभारले. त्यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे.
विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी सातत्याने प्रवास आणि त्यातून अनेक विषयांवर विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. अनुभवाचा समृद्ध झरा असलेले हे व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नाही.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.
ॐ शांति
-विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *