
कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक 8,9 ऑक्टोबर 2024 रोजी कोल्हापूर येथे भारतीय डाक विभागाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र सर्कल स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत देवयानी गागरे या खेळाडूने अजिंक्यपद पटकाविले आहे बंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.देवयानी सोमैया विद्यामंदिर, साकरवाडीची बॅडमिंटनपटू आहे 2012 साली तिच्या संघाने संपूर्ण महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकावला होता.देवयानीला क्रीडाशिक्षक संजय अमोलिक यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या यशाबद्दल कोपरगांव तालुका क्रीडा समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य तसेच माजी, आजी सर्व क्रीडा शिक्षक. तसेच सर्व पंचक्रोशीतील नागरिक यांनी अभिनंदन केले
