
कोपरगाव प्रतिनिधी :- राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन संचलित फार्मसीच्या पदवी शाखेतील चतुर्थ वर्षात शिकत असणाऱ्या विनायक सदाशिव गांगुर्डे व हर्षल दत्तात्रय केदारे यांनी राज्यस्तरीय फार्मसी प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आर जे एस फार्मसीची उत्तुंग यशाची परंपरा कायम ठेवली. फार्मसी कॉलेजमध्ये अभ्यासक्रमा सोबत स्पर्धात्मक जगामध्ये आपले आवाहन कायम ठेवण्यासाठी नेहमीच विशेष लक्ष दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रगल्भ ज्ञान, प्रात्यक्षिक ज्ञान, शैक्षणिक ज्ञान उपलब्ध करून देण्याचा मानस संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे यांचा आहे.
या प्रकारचे प्रगल्भज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासाठी येथील सर्व शिक्षक वृंद कार्यरत असतात, त्यामुळे येथील विद्यार्थी अभ्यासक्रमासोबत इतर सर्व स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी घवघवीत व उत्तीर्ण यश संपादन करीत आहेत.विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीसोबत व्यावसायिक जगामध्ये वावरण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम तसेच ऑनलाइन आय आय टी चे ब्रिज कोर्स व इतर ज्ञान प्रसारक म्हणून प्राचार्य डॉ. नितीन जैन व उपप्राचार्य उषा जैन व इतर सर्व शिक्षक करीत असतात. ही राज्यस्तरीय स्पर्धा अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी ला जागतिक फार्मसी दिनानिमित्त घेण्यात आली.प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेतर्फे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
