

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुका पठारी प्रदेश संपूर्ण देशाला सर्व दिशांना मध्यवर्ती असून या परिसरात देव दैत्य, प्रभु रामचंद्र, मुनी वर्य शुक्राचार्य महाराज,श्री साईबाबा,संत रामदासी महाराज श्री जंगलीदास माऊली संत जनार्दन स्वामी आदी हजारो संत, महात्मे, ऋषी मुनीं , समाज सुधारकांची कर्मभूमी आहे. या प्रदेशातील दोनशे किलोमीटर अंतरात प्राचीन अर्वाचिन तीर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळे आहेत.
अशा पावन भुमीत धार्मिक रूढी परंपरेत भगवंत विठोबा रखुमाई भक्ती रसांचे बाळकडू लाभलेले मुक्ता पाटील पानगव्हाणे खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी मुक्तानंदी जिवन एकट्यानेच जगले नाही तर बिनधास्त अनमोल जनसेवी मानवी जीवन कसे सर्वार्थाने हसतमुखाने जगायचे हे मुक्ता पाटील यांच्या सहवासात राहिल्यानंतर आमच्या सारख्या लाखो जनतेच्या आपोआप अंगवळणी पडले .
कोपरगांव तालुक्यातील सर्व सामान्य कुटुंबात प्रतिकूल परिस्थितीतही कोणत्याही तणावास ते स्वभाव गुणांमुळे बळी पडले नसल्याने त्यांच्या कपाळावर कधीच आठ्या पडल्या नाही तर ते रागानेच लालबुंद झालेल्या माणसाला कधी हसवायला लावयाचे हे कधीच कोणाला कळत नव्हते नव्हते.,
कोणत्याही चर्चेला अथवा उत्तराला बंधन नाही अशा ग्रामीण वळणावरील सतत पोट धरून मनमुराद हसवणाऱ्या
मुक्ता पाटील यांचा सर्व समावेशक स्वभाव, आबालवृद्धांशी सर्वांना आपले वय, प्रतिष्ठा विसरायला लावत मोकळ्या संवादशैलीमुळे आपलेसे करण्याच्या हातोटीने ते सर्वांचे मित्र, कौटुंबिक सदस्य बनले. चावडीवरील चर्चेच्या अघळपघळ गप्पा, राजकिय , सामाजिक, आर्थिक , कौटुंबिक, परिस्थितीवर सडेतोड, पारदर्शक,मार्मिक, मार्गदर्शक निर्भिडतेतून मिळणारा सहवास लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मानवी अळणी जीवनात मिळणारा मुक्ता पाटील यांचा कौटुंबिक सहवास आयुष्यभर पिडीत वंचित , खचलेल्या तणावात त्यांना भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला कायम मोफत विनासायास लाभला. कोणत्याही स्वरूपातील धार्मिक, सामाजिक,लग्न समारंभ, दशक्रिया विधी कार्यक्रम प्रसंगी ते हिरारीने धोतर खोचून सहभागी होतांना आपल्या मार्मिक, विनोद शैलीतील मुक्ताफळांनी या समारंभाला आगळयावेगळ्या उंचीवर नेतो.
सर्व सामान्य माणसाला आनंदी ठेवणाऱ्या आणि कोणत्याही तणाव व समस्येतून मुक्त करणाऱ्या धडाडीने त्यांच्या जीवनातील आत्मियता, निस्वार्थी, नितळ तळमळीचा वैशिष्ट्यपूर्ण गुण सर्वसामान्यांच्या जीवनात कायम आनंद उधळीत राहिला.
मुक्ता पाटीलांची खासियत अशी होती की आपल्या सत्तर वर्षांच्या जीवनात एकही आंदोलन, मोर्चा, सर्व सामान्य जनतेच्या समस्या वरील बैठका, विविध सभा सहकारी संस्था, कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा , जाहीर सभा, पाट पाण्याचे आणि शेती समस्या अथवा प्रश्नावरील चर्चा , शासन आयोजित बैठकात कोणत्याही परवानगीची वाट न पाहता केवळ पोटतिडकीने ते मार्मिक , निर्भयतेने संबंधित चर्चेत आपली सडेतोड भाषणात दोषी अधिकारी, लोक प्रतिनिधी यांना जाब विचारून या समस्या सोडवण्यासाठी प्रवृत्त करीत यातून कधीच माजी केंद्रीय मंत्री स्व. बाळासाहेब विखे, माजी मंत्री स्व .शंकरराव काळेसाहेब , आणि शंकरराव कोल्हे साहेब, माजी खासदार स्व. सुर्यभानजी वहाडणे साहेब, माजी विधानपरिषद माजी सभापती स्व. प्रा.ना.स.फरांदे, स्व.नामदेवरावपरजणेनामदार राधाकृष्ण विखे कधीच , आमदार खासदार मंत्री वरिष्ठ अधिकारी सुटले नाही. या नेत्यांना धारेवर धरल्याने अनेक वेळा टिंगल टवाळी, अपमानास्पद वागणूक मिळत असताना ते कधीच मागे हटले नाही. फक्त जनसमस्यांचे प्रश्न निस्वार्थी पणे मांडत असल्याने ते कायम सर्वांना महत्वाचे ठरले . आपल्या बालपणा
पासून वारकरी संप्रदाय संस्कारातून त्यांनी दरवर्षाची पंढरपुरी वारी कधीच चुकवली नाही. याच पंढरपुरी वारीत मनमाड येथील ह.भ.प.स्व. रामदास कैकाडी महाराज यांचे पटशिष्य बनून प्रत्येक वारीचा आर्थिक भार कमी करण्यासाठी अहिल्या नगर जिल्ह्यातील. विविध कार्यालयांत जावून गावोगावी जाऊन ते ओळखीतील संपर्कातून वारी खर्चासाठोआर्थिक निधी दरवर्षी उभारण्यात त्यांनी न थकता सर्वस्व
पणाला लावले या कामात त्यांचेवर कधीच गैरसमज,गैर आरोपांच्या कलंकाचै डाग त्यांच्या बिगर निळीच्या,चुरगाळलेल्या कपड्यावर पडले नाही. पंढरीतील कैकाडी महाराज वारकरी संस्था नावारूपाला आणण्यात ते यशस्वी ठरले. याचमुळे अहिल्या नगर जिल्ह्यात व पंढरपुरी ह.भ.प.रामदास कैकाडी महाराज पालखीने एक आगळे वेगळे स्थान निर्माण झाले.
आमच्या मातोश्री स्व.किरण देवी खेमचंद अग्रवाल यांना पंढरपुरी विठाई रूक्मिणी भेटीची ओढ जेष्ठ मराठी महिन्यांपासून लागायची परंतु स्वतःच्या आरोग्य क्षमता आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या मुळे त्यांना पंढरपुरी कायम जाणे शक्य नव्हते अशा परिस्थितीत त्या भर तळपते ऊन, पाऊस याची तमा न बाळगता नगर -मनमाड रोडवरुन पंढरपुरी जाणाऱ्या पालख्यातील व इतर वारकऱ्यांना तहानभूक लाडू,चहा, पिण्याच्या पाण्याची सोय करीत. याच सेवेतून स्व. रामदास कैकाडी महाराज,स्व. मुक्ता पाटील यांचा घरोबा वाढला. याचमुळे गेल्या 30 वर्षांपासून कोणत्याही स्वरूपात कोरोना काळ वगळता कधीच खंड न पाडता आजपर्यंत आमच्या अग्रवाल कुटुंबियांकडून स्वतःच्या घरी कोपरगांव तालुक्यातील वारकरी, सर्व जाती धर्माच्या सर्व स्तरातील जनसहभागातून स्व.कैकाडी महाराज पालखी सोहळ्यात रात्रीचा एक मुक्काम पार पाडला जातो. यामध्ये कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेबांच्या तीन पिढ्यांतील सर्वं कुटुंबियांच्या सहभागातून पंढरपुरी वारीत एक दिवस रात्रीचा विसावा भजन कीर्तन सोहळ्याने पार पडतो याप्रसंगी स्व. मुक्ता पाटील यांचे सर्वाधिक सहकार्य कायम लाभले.
परमेश्वराने हा एक असा अवलिया जन्माला घातला की,
एक निडर , बिनधास्त, निस्पृह, निरागस निगर्वी स्पष्टवक्तेपणा , कायमस्वरूपी कोणत्याही स्वरूपात राग लोभाची पर्वा न करता मैत्री मजबूत करीत जनसंपर्कात येणाऱ्याला आपलेसे करण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा माणूस राग, लोभ, अहंकार, द्वेष, संशयास्पद वर्तन, तणाव, मानापमान मुक्त आदी थोर संत सगुण वारसा आयुष्य भर त्यांनी जोपासल्याने ते खऱ्या अर्थाने लोकमान्य ठरले व त्यांनी मुक्ता पाटील हे नाव सार्थ ठरविले अशा थोर व्यक्तींचे चरणी भावपूर्ण श्रद्धांजली !!! तसेच त्यांचा हा वारसा प्रामाणिकपणे त्यांचे चिरंजीव डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे व त्यांचे कुटुंबीय राहाता आणि शिर्डी परिसरात साईयोग फौंडेशनच्या वतीने चालवत आहेत त्यांच्या या महान कार्यात सर्व प्रकारचे पाठबळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!
— जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव
