
कोपरगाव प्रतिनीधी:-
कोपरगाव शहरातील टिळकनगर या ठिकाणी माता लक्ष्मी आईची जत्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली असुन दि. ३० एप्रिल रोजी या जत्रेचे आयोजन जय लक्ष्मी आई मित्र मंडळाच्या वतिने या जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.


भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे हे मंदिर असुन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिभवाने पुजापाठ करुन वरखेड येथून पायी ज्योत आणली असुन या ज्योतीचे मंदिरात पूजन केले आहे. याप्रसंगी महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले आहे.


३० एप्रिल रोजी सुप्रसिद्ध गायक सोनु साठे यांचा भक्तिगीताचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.यावेळी मंदिरात दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी झाली होती.


