संवत्सरमध्ये सावता माळी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी-: कोपरगाव तालुक्यातील पुर्व भागातील संवत्सर मधील ससाणेनगर येथील योगेश रमेश ससाणे यांच्या येथे सावता महाराज प्रेमी मंडळींच्या प्रयत्नाने श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळा दि.३ आगस्ट रोजी सकाळी १० वाजता साजरा करण्यात येणार आहे.या सोहळ्या निमित्ताने रामायणाचार्य,भागवताचार्य ह.भ.प.परशुराम महाराज अनर्थे यांचे जाहीर प्रवचनाचा कार्यक्रम होनार आहे.तरी ज्ञानामृत श्रवणाचा व महाप्रसाद जास्तीत-जास्त भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज मंडळ,परीवार व अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *