कोरोना लसीकरण मोहिमेसाठी खाजगी डॉक्टरांची मदत घ्यावी:- अँड.नितीन पोळ….

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना साथीच्या आजाराने तालुक्यात थैमान घातले असून सरकारी हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू असले तरी प्रशासनाने लसीकरण वेग वाढविण्यासाठी खाजगी डॉक्टरांची मदत घ्यावी असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व विविध सामाजिक संघटनांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
अँड.पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव तालुक्यात करोना साथीच्या आजाराने पुन्हा थैमान घातले असून रोज सापडणाऱ्या पेशंटचा आकडा द्वि शतकाकडे वाटचाल करत असून अशीच परिस्थिती राहिली तर साथीच्या आजाराची परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते लॉक डाऊन करून देखील रुग्ण संख्येत फारशी घट होताना दिसत नाही
करोना साथीच्या लसीकरण करण्याचा वेग वाढवणे आवश्यक आहे ग्रामीण रुग्णालय व ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे मात्र हे लसीकरण व त्याचा वेग कमी पडत असेल तर प्रशासनाने तातडीची मदत म्हणून खाजगी डॉक्टरांची मदत घेणे आवश्यक आहे कोपरगाव तालुक्यात अनेक सुसज्ज हॉस्पिटल आहे त्याच प्रमाणे रुग्ण सेवे साठी प्रशासनाने आवाहन केल्यास खाजगी डॉक्टर देखील लसीकरण मोहिमेसाठी मदत करू शकतील त्या साठी प्रशासनाने ठोस पाऊल उचलणे आवश्यक आहे त्या साठी जास्तीत जास्त लस उपलब्ध करावी
रुग्ण संख्येची धक्कादायक वाढ पहाता प्रशासनाने खाजगी डॉक्टर यांच्या सोबत चर्चा करून त्वरित निर्णय घ्यावा व साथीच्या उद्रेकातून होणारी जीवित हानी टाळण्यासाठी उपाय योजना करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे सोमनाथ म्हस्के,किरण अढांगळे, सुजल चंदनशिव, दत्तू खैरनार,पप्पू वीर, राजू रोकडे,गोपीनाथ ताते, रवी शेलार घटनाकार मैत्री संघाचे गौतम बनसोडे,नितीन बनसोडे,व्यापारी समितीचे अकबर शेख निसार शेख,चर्मकार संघाचे दिलीप कानडे, संजय पोटे, सागर आहेर लहुजी टायगर सेनेचे शरद त्रिभुवन,विजय काकडे, देशभक्ती विचार मंचचे रवी जगताप, किशोर चोरगे एकलव्य संघटनेचे किरण ठाकरे गोरख नाईक,अधिवासी संघटनेचे अमित आगलावे,श्रमिक कामगार संघटनेचे अजय विघे तसेच मंगेश औताडे आदींनी या पत्रकात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *