

कोपरगांव प्रतिनिधी:-सालाबादप्रमाणे याही वर्षी सनातन भारतीय संस्कृती मार्फत नगरपालिका शाळा नंबर ९ येथे गरीब व गरजू अशा वीस विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. स्कूल बॅग मिळाल्याने विद्यार्थी प्रचंड आनंदीत झाले.या संस्थेमार्फत नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. नुकतेच संस्थेच्या वतीने गरजू महिलांना साड्यांचे वाटप देखील करण्यात आले.
