
कोपरगांव प्रतिनिधी:-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (अभियांत्रिकी विभाग) घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकल नुकतेच जाहिर झाले असुन त्यात संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातुन उत्तिर्ण झालेल्या १८ विध्यार्थ्यांची जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मृद व जलसंधारण विभागात काहींची प्रथम वर्ग अधिकारी तर काहींची द्वीतिय वर्ग अधिकारी म्हणुन निवड झाली आहे, लवकरच हे सर्व विध्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या सेवेत रूजु होणार आहेत, अशी माहिती संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीन प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पत्रकात म्हटले आहे की माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी विध्यार्थ्यांनी एमपीएससी व युपीएससीच्या परीक्षा देवुन शासकिय सेवेत जावुन समाजाची सेवा करावी हा विचार नेहमी रूजविला. त्या अनुषंगाने आजही संस्थेमध्ये विध्यार्थ्यांना तज्ञांच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात येते. यापुर्वी एकट्या सिव्हिल इंजिनिअरींग विभागाचे सुमारे १५० पेक्षा अधिक माजी विध्यार्थी शासकीय सेवेत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. अलिकडेच जाहिर झालेल्या एमपीएससीच्या निकालात संजीवनीचे तब्बल १८ विध्यार्थी निवडले गेले. विशेष म्हणजे आत्तापर्यंत निवड झालेले बहुतांशी विध्यार्थी हे ग्रामिण भागातील आहेत. शासकीय नोकरीत अधिकारी म्हणुन निवड झालेल्या विध्यार्थ्यांमुळे खऱ्या अर्थाने कै. शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे.
जलसंपदा विभागात प्रियंका गुजाळ, हर्शदा अशोक चाफेकर, शिवाजी नारायण माळवदे, अश्विनी खैरणार, अशलेषा ज्ञानदेव गमे, मंगेश देवानंद टोपले यांची असिस्टंट इंजिनिअर पदावर निवड झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात अनिकेत अन्नासाहेब कदम, धनंजय एकनाथ सोनवणे, पंकज विलास कळसकर, सुरेश भास्कर चासकर, तुषार उत्तम एरंडे, पुजा मुक्ताजी लाकुडझोडे, सागर ढोकणे, हर्शल पाटील, शरद खेसे, वर्षा चोरमुंगे यांची असिस्टंट इंजिनिअर पदावर निवड झाली आहे. मृद व जलसंधारण विभागात मेघना कैलास दरेकर, चेतना बाळासाहेब शिंदे यांची सब डिव्हिजनल वाटर काॅन्झर्वेशान ऑफिसर म्हणुन प्रथम वर्ग अधिकारी अशी निवड झाली आहे.
संजीवनी मधिल उत्कृष्ट अध्यापन आणि अध्ययन, विविध स्पर्धांमधुन मिळणारे ज्ञान, एमपीएससी व युपीएससीचे तयारी कशी करावी याचे मार्गदर्शन, इत्यादी बाबींमुळे आज ग्रामिण भागातील मुलं मुली शासनाच्या विविध पदांवर रूजु होवुन समाजातील संबंधित घटकांसाठी कार्य करणार आहेत. या बाबीचा त्यांच्या पालकांबरोबरच संजीवनीच्या व्यवस्थापना सहित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना अभिमान आहे. आज निवड झालेले विध्यार्थी जरी संजीवनीत नसले परंतु ते संजीवनी परीवाराचे सदस्य आहेत, त्यामुळे परीवारातील सदस्य जेव्हा प्रगती करतात, तेव्हा सर्वांनाच आनंद होतो, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.
विध्यार्थ्यांच्या यशाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी निवड झालेल्या सर्व विध्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या भाग्यवान पालकांचे, संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, सिव्हिल इंजिनिअरींग विभागाचे विभाग प्रमुख डाॅ. एम. एस. पुरकर यांचे अभिनंदन केले आहे.
