के. बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे उपप्राचार्य ढेकळे. एस. पी. यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिन का साजरा केला जातो याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य बारे. एन.जी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र ही महापुरुषांचीभूमी आहे म्हणून विद्यार्थ्यांनी थोर युगपुरुषांचे विचार आत्मसात करावेत व उज्वल यश साध्य करावे असे यावेळी ते बोलताना म्हणाले. विद्यार्थ्यांनी आदर्श विचार आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांची प्रगती होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पवार एस.बी यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रा. रणधीर ए.बी. यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *