१ मे महाराष्ट्र दिन आणि कामगारदिनानिमित्ताने परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर प्रशासनाच्यावतीने मंदिरातील कर्मचाऱ्यांचा छोट्याखानी सत्कार संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
१ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार
दिनानिमित्ताने परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर प्रशासनाच्या वतीने मंदिरातील सर्व सन्माननीय कर्मचाऱ्यांचा छोट्याखानी सत्कार करण्यात आला. हे कर्मचारी बाराही महिने अहोरात्र मंदिरामध्ये सेवा देत राहतात कामगार दिनाच्या निमित्ताने मंदिर प्रमुख श्री सचिन परदेशी, मंदिर उपप्रमुख श्री प्रसाद प-हे, कमिटी मेंबर श्री आदिनाथ ढाकणे यांनी या कर्मचाऱ्यांचा छोटाखानी सन्मान केला आणि त्यांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मंदिराचे व्यवस्थापक श्री राजारामजी पावरा, मंदिराचे पुजारी श्री नरेंद्र जोशी व श्री राकेश भणगे गुरुजी तसेच मंदिराच्या अन्नपूर्णा सौ शोभाताई कुलकर्णी, सौ शोभाताई ढाकणे, श्री सुभाषजी ढाकणे या सर्वाचा सत्कार करण्यात आला यामुळे सर्व कर्मचारी आनंदीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *