साईबाबा कॉर्नर येथे होत असलेल्या नवीन जलकुंभाला परम सद्गुरु सक्राचार्य महाराज जलकुंभ असे नावे देण्याची मागणी गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट यांनी निवेदनाद्वारे केली…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
नमस्कार जय शुक्राचार्य आम्ही आत्ता कोपरगाव नगर परिषदेमध्ये माननीय मुख्य अधिकारी साहेब यांना भेटण्यासाठी व एक निवेदन देण्यासाठी आलो होतो आपणा सर्वांना माहितीच आहे की कोपरगाव शहर हे प्रामुख्याने ओळखले जाते ते गुरु शुक्राचार्य महाराज यांची तपोभूमी म्हणून तसेच गुरु शुक्राचार्य महाराजांकडे असलेल्या संजीवनी मंत्रामुळे व त्यांनी येथे केलेल्या विवाहसिद्ध होम होमामुळे तसेच या मंदिरास दिलेल्या कधीही कुठल्याही शुभकार्यास मुहूर्त पाण्याची आवश्यकता नाही या दुर्मिळ आशीर्वादामुळे आज हे मंदिर संपूर्ण भारतभरच नव्हे तर जगाच्या पाठीवर झळकू लागले आहे आणि त्यामुळे कोपरगाव शहराची ओळख ही वाढली आहे परंतु आम्हा सर्व शुक्राचार्य भक्तांना एक खंत पूर्वीपासून आहे की ज्या शुक्राचार्य महाराजांमुळे कोपरगाव शहराचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे त्या शुक्राचार्य महाराजांचे नाव कोपरगावात कोठेही दिसत नाही कुठल्याही इमारतीला किंवा कुठल्याही वास्तूला त्यांचे नाव नाही ही खंत सर्व ग्रामस्थांची , ट्रस्टींची , स्थानिक व्यवस्थापन कमिटीची तसेच तमाम शुक्राचार्य भक्तांची फार पूर्वीपासूनची आहे तेव्हा आम्ही मुख्य अधिकारी साहेब यांना निवेदन दिले की साईबाबा कॉर्नर येथे फिल्टरेशन प्लांट जवळ होत असलेल्या नवीन जल कुंभा ला परम सद्गुरु सक्राचार्य महाराज जलकुंभ असे नाव द्यावे या संदर्भात निवेदन देण्यासाठी गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड मंदिर प्रमुख श्री सचिन परदेशी उपमंदीर प्रमुख श्री प्रसाद प-हे कमिटी मेंबर श्री संजय वडांगळे श्री अरुण जोशी श्री धरमशेठजी बागरेचा श्री शैलेश साबळे श्री बाळासाहेब लकारे इत्यादी शुक्राचार्य भक्तांबरोबर निवेदन देण्यासाठी गेलो असता मुख्याधिकारी साहेब यांनी निवेदन स्वीकारले व या कामी योग्य ते पाऊल उचलले जाईल याची आश्वासन दिले या निमित्त मी कोपरगावातील सर्व हिंदू तसेच शुक्राचार्य भक्तांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी याबाबत मुख्याधिकारी साहेब तसेच माननीय आमदारश्री आशुतोष दादा काळे साहेब यांना निवेदन देऊन कोपरगाव ची ओळख असलेल्या शुक्राचार्य महाराजांचे नाव या नवीन जल कुंभास द्यावे यासाठी आग्रह धरावा धन्यवाद जय हिंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *