डॉ.रामदास आव्हाड आयुर्वेद रत्न पुरस्काराने सन्मानित…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
डॉ डी वाय पाटील युनिव्हर्सिटी मुंबई तर्फे कोपरगाव येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ रामदास आव्हाड यांचा मानाचा आयुर्वेद रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .याप्रसंगी डॉ आव्हाड यांचे सर्व फॅकल्टी व विद्यार्थ्यांसाठी “पेन मॅनेजमेंट थ्रू आयुर्वेद “या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .त्या ज्ञानवर्धक स्वानुभवावर आधारित अशा व्याख्यानानंतर डॉ आव्हाड यांना आयुर्वेदरत्न पुरस्कार प्राचार्य डॉ अमर द्विवेदी व आयुर्वेद डीन डॉ.महेश हरीत ,श्री विजय पाटील v सर्व स्टाफ यांचे उपस्थितीत देण्यात आला .पुणेरी पगडी ,स्मृतिचिन्ह ,मानपत्र व शाल स्वरूपात हा पुरस्कार देण्यात आला .टाळ्यांच्या गजरामध्ये हा पुरस्कार घेतांना स्क्रिनवर डॉ आव्हाड यांचा जीवनप्रवास दाखविला जात होता .ग्रामीण भागात राहून आजपर्यंत आयुर्वेदातील व सामाजिक क्षेत्रातील चाळीसहून अधिक पुरस्कार प्राप्त करणाऱ्या डॉ आव्हाड यांची आयुर्वेदावरील अतूट श्रद्धा ,विश्वास ,निरंतर मेहनत व रुग्णांप्रतीची भावना हेच या यशामागील खरे गुपित असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये दिसून आली .या यशाबद्दल डॉ आव्हाड यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *