
कोपरगाव प्रतिनिधी (देवळाली प्रवरा):-
माणसातील ‘पांडुरंग’..!
‘ईश्वर चराचरांत वसलेला आहे, तो प्रत्येक व्यक्तीत आहे.’ अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे सुरू असलेल्या संजीवन कोविड हॉस्पिटलमध्ये डॉ. जगदीश वाबळे यांच्या रुपात मला माणसातील पांडुरंग दिसला.
मला जेंव्हा कोविड मुळे संजीवन मध्ये दाखल केले, तेंव्हा माझा HRCT Score 17 होता, मी जगेल की नाही अशी शक्यता मलाच वाटू लागली होती. पण जेव्हा डॉ. वाबळे बोलले की, तुम्ही चोवीस तासात पूर्व पदावर याल तेंव्हा जीवात जीव आला.
डॉक्टर वाबळे यांचे बद्दल अधिक माहिती घेतली असता समजले की, संजीवन हॉस्पिटल हे राज्यातील पाहिले सर्वात मोठे कोविड सेंटर असून या ठिकाणी आजवर अडीच हजार पेक्ष्या जास्त कोविड रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. जनसेवा हीच ईश्वर सेवा असे समजून आजही डॉ वाबळे दिवस रात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करीत आहेत. त्यांच्या मते कोरोनाला अजिबात घाबरू नका, फक्त स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित अंतर पाळा, मास्क लावा, हात स्वच्छ धुवा हे साधे नियम पाळा.
या सर्वांतून मला मात्र मरणाच्या दाढेतून परत माघारी खेचून आणणारा पांडुरंगच डॉ वाबळे यांच्यात दिसला असेच मी म्हणेल. म्हणून या माणसातील पांडुरंगाला शतशः नमन
तसे पाहिले तर चरा चरात, प्रत्येक व्यक्तीत पांडुरंग आहे, मग ते दवाखान्यात सोडणारे मित्र असतील, रोज जेवणाचा डबा देणारा नातेवाईक असेल, बिल भरायला पैसे देऊ का विचारणारे हितचिंतक असतील, रोज फोन करून खुशाली विचारणारे हितचिंतक असतील, वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी वर्ग अश्या सर्वात पांडुरंग आहे.. फक्त तो आपल्याला दिसला पाहिजे. किंवा ते भाव तरी मनी असायला हवेत.. !
मला जीवदान दिलेबद्दल संगमनेर येथील संजीवन हॉस्पिटल चे सर्व डॉक्टर, नर्स, कर्मचारी आणि हितचिंतकांचे हार्दिक आभार, धन्यवाद..!
आप्पासाहेब ढुस
देवळाली प्रवरा.
