तहसील कार्यालय कोपरगाव येथे आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाययोजना करण्यासंदर्भात बैठक पार पडली…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
तहसील कार्यालय कोपरगाव येथे आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाययोजना करण्यासंदर्भात बैठक पार पडली.


यावेळी लवकरच कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये ५० ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी सांगितले तसेच व्यापाऱ्यांच्या वतीने शनिवार – रविवार स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव, शहराचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. वैशाली बडदे, आय.एम.ए. चे अध्यक्ष डॉ. गोंधळी, डॉ. अजय गर्जे, काका कोयटे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदर डडियाल, युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष तुषार पोटे, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, रवींद्र पाठक, कारभारी आगवन, सुधीर डागा, सुनील बोरा, भरत मोरे, प्रफुल्ल शिंगाडे, अंकुश वाघ, राहुल देवळालीकर, सुधाकर होन, बापू काकडे, शरद त्रिभुवन, गुलशन होडे, राजेंद्र बंब, मन्नू कृष्णानी, संदीप लोढा, धनंजय कहार, पत्रकार बंधू आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *