
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगावचा शहराचा पाणी प्रश्न निश्चित सुटू शकतो………..या साठी जर शासनाकडे योग्य कागदपत्रा चा पत्र व्यवहार करून नगरपालिकेने सतत पाठपुरावा केला पाहिजे .कारण शासन दरबारी कागत भोलतो. तोंडी सांगून नाही चालत..
जर येसगाव येथील 1 ते 3 नंबर च्या तळ्यांचा गाळ शासनाच्या मार्फत सर्व्हे करून संपूर्ण पने 100 % काढला पाहिजे. त्याच बरोबर सध्या सर्वात मोठे असणारे 4 नंबर च्या तळ्यांचे राहिलेले काम पूर्ण केले ( साधारण आजून 50 % काम खोली करणाचे बाकी आहे ) तर , तसेच येवला नगरपालिकेचे तळे जर आपण ते आपल्या नगरपालिकेला जर शासन तर्फे आपण मिळवले आणि त्याचा गाळ काढला तर ते आपल्या उपयोगात यु शकते कारण ते जवळ जवळ 90 % गाळाने भरले आहे आणि सर्वात महत्वाचे नवीन 5 नंबर चे तळे झाले तर आपली मोठी पाण्याची सोय होणार आहे आणि बऱ्या पैकी पाणी समस्या सुटू शकेल .या साठी मा. आमदार.आशुतोष दादा काळे साहेब प्रयत्न करीत आहेतच.कारण पाणी साठवण लागणार च , मग पाणी पाईप लाईन नी कुठून ही आणलेतरी. हे सर्वे होई परियन्त आणि नंतर ही एक्सप्रेस कॅनॉल मधून पाणी उचलायची परवानगी जर मिळाली तर त्याचा ही खूप उपयोग होईल.
आणि सर्वात महत्वाचे की कोपरगाव शहरातील पाणी योजना जो परियन्त 100 % कार्यवीत होत नाही , करत नाही तो परियन्त घाण , कधी गटाराचे , कधी गढूळ पाणी येतच राहणार. पाणी जरी आले आणि फिल्टरेशन झाले आणि डिस्त्रीबिउशन लाईनचे काम झाले नाही तर घाण पाणी येतच राहणार यासाठी शहरातील सर्वे पाईपलाईन चे काम जोडणे / होणे गरजेचे आहे .हे सर्वे होण्यासारखे आहे. पुढील साधारण वाढ होणारी 25 वर्षाची लोकसंख्या विचारात घुंन नियोजन केले पाहिजे.
हे सर्वे झाल्यावर सर्वांना सारखे रोज किंवा एक दिवसाआड पाणी देता येईल आणि जे 6 , 8 , 12 ,24 तास पाणी काहींना आहे ते आपोआपच बंद होईल आणि सर्वात सारखे मुबलक पाणी मिळेल………पाणी आले आणि हे सर्वे होण्यासारखे आहे , हे झाले तर आपोआपच कोणी गाव सोडून जाणार नाही आणि खऱ्या अर्थाने समृद्ध होईल ,प्रगती होईल , व्यापार वाढेल आणि कोपरगाव कॅलिफोर्निया म्हणून दिसेल , होईल….
मंगेश मा.पाटील माजी.नगराध्यक्ष
सदस्य.पाणी संघर्ष समिती, कोपरगाव…
