पुणतांब्यात मंगळवारी पहाटे सुमारे पाऊनतास पावसाच्या सरी कोसळल्या. विज पुरवठा खंडीत….

कोपरगाव

(पुणतांबे प्रतिनिधी किरण नाईक):- मंगळवारी,ता.22. पहाटे पाऊस झाल्याने शेतक-यांची धांदल ऊडाली. पाऊस सुरु होताच विज पुरवठा विज पुरवठा खंडीत झाला. सुमारे सहा तासानंतर विज पुरवठा पुर्वरत झाला. या पावसाचा फायदा रब्बी हरभरा. पिकाला होणार आहे. पावसाने ऊस तोडी बंद झाल्या. अवेळी पाऊस पडत असल्याने शेतक-यांचे शेतीचे नियोजन कोलमलडले जात असल्याने शेतकरी अडचनित सापडत आहेत.
मंगळवारी पहाटे तिन वाजता अचानकच पाऊस पडायला लागाला. शेतक-यांनी खरीपात काढलेला शेतमाल वाळवनीला घातला होता. पाऊसास सुरुवात होताच शेतीमाल झाकुन ठेवन्यासाठी शेतक-यांची पळापळ झाली. रस्ते चिखलमय झाल्याने साखर कारखान्याच्या सुरु असलेल्या ऊस तोडी बंद झाल्या. हरभरा पिकाला मात्र हा पाऊस वरदान ठरनार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *