
कोपरगाव प्रतिनिधी :-
देव – दैत्य, संत महात्मे यांच्या कर्मभूमीत संगीतकला संवर्धनातून महाराष्ट्रात भारतीय संस्कृती आणि संगीत परंपरेची 1958 साली आपल्या अंधत्वाने न खचता आपले कनिष्ठ बंधू स्व.सुधाकर यांच्या सहकार्याने शिवाजी रोड येथे सलग अहोरात्र अविरत किमान दहा हजार कलावंत घडविण्यासाठी स्व. आनंदराव अण्णा आढाव यांनी सात दशके सर्वस्व पणाला लावले.
स्व. आनंदराव यांनी गायन कलेला न्याय देतानाच हार्मोनियम पेटी , तबला बासरी वादन वादकांची परंपरा जनसेवेसाठीनिर्माण केली.
पन्नास वर्षांत अहिल्या नगर, नासिक, संभाजी नगर जिल्ह्यात आपल्या शागिर्दा सह प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यात व कार्यक्रमात आपल्या पठडीतील संगीत कलेतून जनसेवा करतांना जनहृदयात अढळ स्थान पटकावले
साठ वर्षांत तत्कालीन काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञान व बदलत्या शास्त्रीय संगीत,भजनक्षेत्रात विविध वादन , गायन कलेत सौ. स्वाती फडके, नितीन जोशी, अनिल कुलकर्णी, किर्तनकार रेखा गायकवाड बासरी व तबलावादक विकास किर्लोस्कर ,कल्पना गुजराथी ,साधना कोद्रे, स्व शरद पाटील, माधव जोशी ,रवींद्र पिंगळे, प्रा. अविनाश घैसास संगिता विशारद दिपाली कुलकर्णी केतन कुलकर्णी, नितीन डोंगरे डॉ अभय दगडे डॉ दत्तात्रय मुळे, आदी हजारो कलाकार घडविले
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम संत एकनाथ,सह शेकडो संतांच्या दोन हजारावर अभंग आणि भजनांना मंत्रमुग्ध चाली लावल्या
पुणतांबा येथील जागतिक संगितकार ही.रामचंद्र चितळीकर, रेडिओ स्टार बाबा नरोडे, राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी,संत रामदासी महाराज, भारत रत्न भिमसेन जोशी, मन्ना डे, हेमंत कुमार, महंमद रफी आशा भोसले, उषा मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर मुकेश, ओ पी नय्यर कल्याण आनंद आदींच्या मित्रमैफलीत सहभागी झाले.
जागतिक वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले,
स्व.नेते यशवंतराव चव्हाण, बी. एन दातार माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, हृदय नाथ मंगेशकर, आदी आनंद राव आढाव अण्णा यांच्या मैफलीत अनेक वेळा मंत्रमुग्ध झाले.
स्व.आनंदराव अण्णा आढाव यांना अंधत्वकाळात त्यांचे बंधू स्व.सुधाकर, श्रीमती वैशाली वहिनी, पुतणे विशाल पिंटू, नगरपरिषद सभापती वैभव आढाव, सूना आदि कुटुंबियांतील सदस्यांनी पित्यासमान अहोरात्र सेवा केली.अशा कर्तबगार अण्णा व आम्ही एकाच गल्लीत रहात असल्याने त्यांनी आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने मोठ्या भावाचे कुटुंबिय प्रेम शेवटपर्यंत लाभले.
आम्ही शिवाजी रोडला असताना श्री.प्रल्हादरावराव दंडवते श्री. नारायण शेठ अग्रवाल, श्री.दिलीपराव कोल्हे, श्री.अशोकराव आढाव, श्री.पोपटराव नरोडे, श्री.शरदराव घाटे, श्री.नानासाहेब सिनगर ह्या आमच्या मित्र मंडळीचे स्व.सुधाकर आढाव हे “बॉस” होते.स्व.सुधाकरराव आढाव यांना शिवाजी रोडला “गाव पाटील” म्हणून ओळखत
अशा मोठ्या भावाचे चरणीं विनम्र अभिवादन !!!
— जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव.
कै.आनंदराव केशवराव आढाव पाटील यांचा दशक्रिया विधी शनिवार दि.18/04/2026 रोजी सकाळी 9 वाजता. अमरधाम कोपरगाव येथे होईल.
