
कोपरगाव प्रतिनिधी:- कर्मवीर शंकरराव काळे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक योगदान अतुलनिय आहे. पत्रकार संघाने त्यांचा केलेला सन्मान ही त्यांच्या कार्याची पावती आहे. पत्रकारांनी नेहमी सत्याची बाजु घ्यावी.आपआपल्या क्षेत्रात केलेले सामाजिक कार्य आध्यत्मापेक्षा कमी नाही. या कार्याची दखल समाज घेत असतो. सत्कर्मातूनच सत्कार होत असल्याचे प्रतिपादन सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले.



कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेशगिरी महाराज होते. पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार मंहत रामगिरी व महंत रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते कर्मवीर स्व. शंकरराव काळे यांना मरणोत्तर तर सहकारमहर्षी शंकरराव काळे यांना मरणोत्तर तर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तर लोकमतचे अहमदनगर
आवृतीप्रमुख तथा संपादक सुधिर लंके यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकारीता पुरस्काराने गौरविण्यात आले.


यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, उद्योजक हनुमंतराव गायकवाड, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, जिल्हा बँकेेचे संचालक विवेक कोल्हे, सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जून काळे, संजीवनी एज्यु.सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे,मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहम, सुमित कोल्हे, अॅड.रविंद्र बोरावके, डॉ. अजय गर्जे, बाळासाहेब कंक्राळे, पोलिस उपनिरीक्षक भारत नागरे, सुजाता लंके, पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ.अरूण गव्हाणे यांच्यासह पत्रकारसंघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कर्मवीर शंकरराव काळे यांना दिलेल्या पुरस्काराबद्दल बोलताना उपसभापती अर्जुन काळे म्हणाले, स्व. काळे यांचे सामाजिक, शैक्षणिक व सहकारातील कार्य अतुलनिय आहे. त्याच्या कार्याची दखल घेवुन पत्रकार संघाने दिलेला जीवन गौरव पुरस्काराचा मी आदरपुर्वक स्विकार करतो. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या सत्काराला उत्तर देताना विवेक कोल्हे म्हणाले, कोपरगाव तालुक्याच्या विकासासाठी विधानसभेत तब्बल ३५ वर्षे शंकरराव कोल्हे यांनी बाजु मांडली. पाणीप्रश्नासाठी त्यांनी उभारलेला लढा सर्वश्रूत आहे. पत्रकार संघाने त्यांच्या कार्याची दखल घेवून जीवन गौरव पुरस्कार दिला. हा पुरस्कार आमच्यासारख्या तरूण कार्यकर्त्यांना नेहमी मार्गदर्शक राहील.
आदर्श पत्रकारीता पुरस्कार स्विकारताना सुधिर लंके म्हणाले, लोकशाहीच्या तीन स्तंभासोबत चौथा स्तंभ समजल्या जाणार्या पत्रकारीतेने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. लोकशाहीमध्ये सत्तेबरोबरच विरोधकही तितकाच महत्वाचा आहे. हा विरोध व त्याची चिकित्सा, त्रृटी दाखविण्याचे काम सर्वसामान्य जनतेच्या वतीने पत्रकार करीत असतो. मोठ्या शहरापेक्षा ग्रामिण भागातील पत्रकारीता अधिक अव्हानात्मक आहे. कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ हे आव्हान समर्थपणे पेलत आहे.

अध्यक्षीय समारोपात रमेशगिरी महाराज म्हणाले, स्व. काळे व शंकरराव कोल्हे यांनी या भागाच्या विकासासाठी महत्वपुर्ण काम केले. अनेक संस्था उभारून रोजगार उपलब्ध केला. सर्वसामान्यांच्या विकासाचे काळे कोल्हे दोन्ही घराने केंद्रबिंदु ठरले. पत्रकार संघाने दिलेले पुरस्कार योग्य व्यक्तींना मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. सुत्रसंचालन प्रा. साहेबराव दवंगे यांनी केले. तर लक्ष्मण जावळेे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शैलेश शिंदे, कार्याध्यक्ष युसुफ रंगरेज, सचिव संतोष जाधव, खजिनदार सिद्धार्थ मेहरखांब, संघटक दिलीप दुशिंग, नानासाहेब शेळके, रोहित टेके, सचिन धर्मापुरीकर, सोमनाथ सोनपसारे, लक्ष्मण वावरे, विजय शेळके, राजेंद्र गाडे, निवृत्ती शिंदे, हेमचंद्र भवर, संजय लाड, संजय भवर, योगेश डोखे, मोबीन खान, काकासाहेब खर्डे, योगेश रुईकर, शाम गवंडी, अमीन शेख, बिपीन गायकवाड, रवींद्र जगताप,सुनील ससाणे यांनी परिश्रम घेतले.
