जिल्ह्यात राजकीय वरद हस्तमुळे होत आहे श्रीरामपूर येथे बेसुमार वाळू उपसा:- राजेंद्र झावरे , महसूल विभागाची भूमिका बुरा मत देखो, बुरा मत सुनो सारखी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- एकीकडे राज्यासह संपूर्ण देशामध्ये जागतिक महामारी ठरलेल्या करोनाचा हाहाकार माजलेला असतांना तर दुसरीकडे जिल्ह्यामध्ये राजकीय पाठबळामुळे श्रीरामपूर ,कोपरगाव, संगमनेर तालुक्यात मोठया प्रमाणावर वाळू उपसा होत असून प्रामुख्याने श्रीरामपूर येथील मातुलठान येथे शासकीय लिलावातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू असून त्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी केली आहे.
यावेळी झावरे म्हणाले की, श्रीरामपूर येथील मातुलठान येथे गोदावरी नदीतून वाळू उपसा करण्याचा लिलाव सुरू असून तो ठेका घेणाऱ्यांनी चार पट वाळू उपसा केलेला असून वाळू माफियांना कोपरगाव ,श्रीरामपूर, संगमनेर,सिन्नर येथील बड्या राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्यामुळे स्थानिक प्रशासन देखील याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे. मातुलठान येथे ५ पोकल्यांड व १० जेसीबी च्या साहाय्याने रोज किमान दोनशे ते तीनशे ट्रक वाळू उपसा होत असून हे सर्व ट्रक नाशिक, पुणे, औरंगाबादसह बाहेरील जिल्ह्यातून
व करोना हॉट स्पॉट ठरलेल्या भागातून येत असून त्या बरोबर वाळू माफियांचा लवा- जमा येतो.तसेच तेथील शहर व गावपुढारी देखील २४ तास नदीत असतात त्यामुळे खरा करोना महामारीचा धोका तिथून वाढू शकतो त्यामुळे प्रशासनाने त्यात तातडीने लक्ष घालून सदर ठेका बंद करावा
तरी महसूल प्रशासनाच्या वतीने वाळू लिलावाच्या ठिकाणचे पंचनामे करून जास्तीचे वाळू उपसा करणाऱ्या वाळू ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी असे न झाल्यास स्थानिक तहसीलदार यांच्याकडून हा दंड जिल्हा महसूल विभागाने करावा अशी विंनती देखील झावरे यांनी केली असून ते म्हणाले की अजून आसपासच्या १५ गावातील लिलाव होणार असून आहे.तेथील गावकऱ्यांना स्थानिक गाव गुंड दमदाटी करतात.नदीकाठी असलेल्या गावातील शेतकरी व गावकरी यांची देखील मागणी लिलाव सुरू होऊ नये व सुरू असलेले लिलाव बंद व्हावे अशी आहे.
त्यामुळे करोनाचे सावट वाढत असल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील सोनारी येथील व तालुक्यातील ठेके चालू करू नये तर जिल्ह्यातील इतर तालुक्यामधील सुरू असलेले वाळू ठेके जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ ,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , जिल्हा पोलिस प्रमुख व जिल्हाधिकारी यांनी तातडीने निदान करोनाचा प्रादुर्भाव कमी होई पर्यंत तरी वाळू उपसा बंद करण्याच्या सूचना देऊन याप्रकारामध्ये लक्ष घालावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी प्रशासनाला केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *