बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांचे अभिवादन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी :- राजकीय क्षेत्रात आपल्या दमदार कामगिरीने व कुशल नेतृत्वाने अमीट ठसा उमटविणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व थोर क्रांतिकारक, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती कोपरगाव शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थित राहून बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी विवेकभैय्या कोल्हे म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे हे दोघेही महान व्यक्तिमत्त्व होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. त्यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या विरोधात रणशिंग फुंकले. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या धगधगत्या कुंडात उडी घेऊन त्यांनी देशासाठी आपले आयुष्य समर्पित केले. ते प्रखर राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहेत. मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत करणारे वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आणि ऊर्जास्त्रोत आहेत. बाळासाहेब ठाकरे हे एक सामर्थ्यवान, दमदार, प्रभावशाली राजकारणी, कुशल व्यंगचित्रकार होते. कणखर भाषा, प्रभावशाली वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखणी हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. बाळासाहेबांनी मराठी माणसांवरील अन्यायाच्या विरोधात लढा दिला. त्यांनी मराठी माणसाला स्वाभिमानाने जगायला शिकवले. नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे या दोन्ही महापुरुषांना जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन!
याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे नेते कैलास जाधव, भाजपचे नगर परिषदेतील माजी गटनेते रवींद्र पाठक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, स्वप्निल निखाडे, शिवसेना शहरप्रमुख सनी वाघ, माजी नगरसेवक अतुलशेठ काले, कालूअप्पा आव्हाड, अनिल जाधव, नारायणशेठ अग्रवाल, रिपाइंचे दीपक गायकवाड, नीलेश बोऱ्हाडे, सतीश रानोडे, जितेंद्र रणशूर, रोहन दरपेल, सुखदेव जाधव, रंजन जाधव, नाना जाधव, राजेंद्र बागुल, कैलास शेळके, खलिकभाई कुरेशी, शफिकभाई सय्यद, रवींद्र लचुरे, योगेश गोर्डे, नीलेश बोधडे, श्रीकांत बागल यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *