“शिर्डी लोकसभे करिता मातंग समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी”:- ऍड नितीन पोळ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
अनुसूचित जाती मध्ये मातंग समाज देखील आहे हे लक्षात घेऊन आगामी लोक सभा निवडणुकीत मातंग समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी मागणी ऍड. नितीन पोळ यांनी केली
मिशन शिर्डी लोक सभा या नावाने शिर्डी लोक सभा मतदार संघातील मातंग समाजातील सामाजिक राजकीय पदाधिकारी व नोकरदार कार्यकर्ते यांनी मिशन सुरु केले असून मतदार संघातील सर्वच विधानसभा मतदार संघात बैठकांचे आयोजन केले जात आहे आज या निमित्ताने कोपरगाव येथे शिर्डी मतदार संघातील पदाधिकारी यांची महत्व पूर्ण बैठक संपन्न झाली या वेळी कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वा खाली राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीना भेटून उमेदवारी मागण्यात येणार आहे
या वेळी बोलताना ऍड पोळ म्हणाले की सण 2009पासून शिर्डी लोकसभा मतदार संघ अनुसूचित जाती साठी राखीव आहे मात्र तीन लोक सभा निवडणुकीत लोक संख्येत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मातंग समाजाकडे राजकीय पक्षानी दुर्लक्ष केले त्यामुळे देशाच्या सर्वोच्च सभागृहात समाजाचे कोणतेही प्रश्न मांडता आले नाही त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षानी समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अन्यथा यावेळी मातंग समाज स्वतः उमेदवार देऊन ताकद दाखवून देईल
कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बागुल होते तर सूत्रसंचालन संजय त्रिभुवन यांनी केले
या बैठकीस विनोद राक्षे, सोमनाथ म्हस्के अशोक आल्हाट ज्ञानेश्वर राक्षे, उत्तमराव शेलार,मंज्याबापू साळवे, सुखदेव जाधव संतोष गायकवाड पोपट सरोदे जगन्नाथ आव्हाड यांनी मार्गदर्शन केले
तर कार्यक्रमास शरद त्रिभुवन, भागचंद नवगिरे, सुजल चंदनशिव, राजेंद्र वैरागळ, संपत राक्षे, दत्ता लाहुंडे, राजेंद्र त्रिभुवन, सनी कांबळे, रवींद्र कांबळे, चंद्रकांत कांबळे, सोन्याबापू शेलार, सुरेश जगधने, नितीन साबळे, किरण अढागळे, बाळू पवार, अशोक म्हस्के भास्कर पवार,बंडू शिंदे, प्रवीण शेलार,भाऊसाहेब आव्हाड,विलास कदम,सोनू गायकवाड, दिलीप तूपसुंदर, गणेश आव्हाड, दामोधर शिंदे
अकोले,संगमनेर, राहुरी, राहता, श्रीरामपूर, नेवासा येथील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
या वेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार बांधवांचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *