
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील मध्यवर्ती तहसील कार्यालय शेजारील मैदानात शुक्रवार, दिनांक १२ जानेवारी २०२४ ते गुरुवार १८ जानेवारी २०२४ या कालावधीत दररोज ७ दिवस सायंकाळी ००: ०७ ते १०:०० वाजेपर्यंत त्रंबकेश्वर येथील शिवभक्त भाऊ पाटील यांच्या प्रवचनाने होणार आहे.
कथेचे आयोजन: जय जनार्दन भक्त व चांगदेवराव कातकडे , मिलनकुमार चव्हाण , मंगेश पाटील , दीपक कोटमे , पराग संधान , मनोज अग्रवाल , राजेश ठोळे , विजय कडू , प्रशांत होन , संदीप कोयटे , हिरालाल महानुभाव , दिनार कुदळे यांनी केले आहे.


या कार्यक्रमाला ब्र.प .पू स्वामी मधुगिरीजी महाराज , प.पू .स्वामी मठाधिपती रमेशगिरीजी महाराज व प.पू.स्वामी माधवगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद लाभले आहेत.
श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व अयोध्यातील प्रभु श्री. रामचंद्राच्या जन्मभूमीत संपन्न होणाऱ्या , श्री राम मंदिर स्थापना समारंभाचे औचित्य साधून श्री राम भक्त व समस्त भाविकांकरिता मर्यादा पुरुषोत्तम श्री राम याच्या दिव्य जीवनावर आधारित श्री राम चरित्र चिंतन कथेचे आयोजन करण्यात येत आहे.तरी सर्वांनी कथा श्रावणाचा लाभ घ्यावा ही विनंती.
