
कोपरगांव प्रतिनिधी:-
ता. 02 कोपरगांव बाजार समितीत शुकवार दि. 02/09/2022 रोजी ओपन कांद्याला 1425/- रुपये भाव मिळाला असुन आवक 9480 क्विंटल एवढी झाली आहे. कांदा नंबर 1 ला 1425/- ते 1150/- रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 2 ला 1125/- ते 800/- रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 3 ला 775/- ते 500/- रुपये भाव मिळाला.
डाळींबाची आवक 763 क्रेटस झाली असुन 175/- रूपये प्रति किलो भाव मिळाला.
डाळींब नंबर 1 ला 175/- ते 120/- रूपये किलो भाव मिळाला.
डाळींब नंबर 2 ला 115/- ते 85/- रूपये किलो भाव मिळाला.
डाळींब नंबर 3 ला 80/- ते 20/- रूपये किलो भाव मिळाला.
तसेच भुसार या शेतीमालाचे बाजारभाव खालीलप्रमाणे.
गहु कमाल बाजारभाव 2450/- रुपये व सरासरी 2341/- रूपये भाव मिळाला.
ज्वारी कमाल बाजारभाव 2901/- रुपये
हरबरा कमाल बाजारभाव 4300/- रुपये व सरासरी 3801/- रूपये भाव मिळाला.
सोयाबीन कमाल बाजारभाव 5240/- रुपये व सरासरी 5151/-रूपये भाव मिळाला
मुग कमाल बाजारभाव 6689/- रुपये व सरासरी 6526/-रूपये भाव मिळाला
तसेच कोपरगांव बाजार समितीचे शिरसगांव-तिळवणी उपबाजार आवार येथे शुकवार दि. 02/09/2022 रोजी ओपन कांद्याला 1201/- रुपये भाव मिळाला असुन आवक 4700 क्विंटल एवढी झाली आहे.
कांदा नंबर 1 ला 1201/- ते 975/- रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 2 ला 950/- ते 700/- रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 3 ला 675/- ते 325/- रुपये भाव मिळाला.
अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक मा. श्री. एन. जी. ठोंबळ यांनी दिली आहे.कोपरगांव बाजार समितीत कांदा खरेदीसाठी बाहेरील राज्यातील व्यापारी आलेले असल्याने कांद्यास चांगले बाजारभाव मिळत असुन शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी प्रतवारी करुनच शेतीमाल कोपरगांव बाजार समितीच्या मुख्य़ व उपबाजार समिती शिरसगांव-तिळवणी येथे विक्रीस आणावा व आपला आर्थिक फायदा करुन घ्यावा असे आवाहन सचिव श्री. एन. एस. रणशुर यांनी केले आहे.
