
कोपरगाव प्रतिनिधी:-
संवत्सर येथील लक्ष्मणवाडी परिसरातील प्रगतशील शेतकरी व ज्येष्ठ कार्यकर्ते भगवतराव देवराम भाकरे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ९५ वर्षे होते. त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी संवत्सर येथे गोदावरी काठावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.
स्व. नामदेवराव परजणे पाटील आण्णा यांचे विश्वासू सहकारी म्हणून कै. भगवंतराव भाकरे पंचक्रोशीत परिचित होते. प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते सर्वत्र परिचित होते. खंडकरी शेतकरी चळवळीत त्यांचा मोलाचा सहभाग होता. गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे पाटील यांनी कै. भाकरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन श्रध्दांजली वाहिली. त्यांच्या पश्चात पत्नी तसेच दगुराव भाकरे, रविंद्र भाकरे व शरद भाकरे ही तीन मुले, दोन मुली, नातू, सुना असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी उपसरपंच विवेक परजणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
