
कोपरगाव प्रतिनिधी:-
देशांच्या प्रगतीमध्ये पत्रकारांचे मोलाचे योगदान आहे.तसेच पत्रकारीतेत बदल घडविण्याची ताकद आहे. असे प्रतिपादन कोपरगांव एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष व प्रसिध्द उद्योजक कैलास ठोळे यांनी केले.श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात ६जानेवारी पत्रकार दिना निमित्त शहर व तालुक्यातील पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार नानासाहेब जवरे हे होते.या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्यांस पुष्पहार घालण्यात आला.

प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित पत्रकारांचे स्वागत उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.कोपरगांव एज्युकेशन सोसायटी सचिव दीलीप अजमेरे यांनी पत्रकार दिना निमित्तानं सर्व पत्रकार बंधुना शुभेच्छा दील्या. संस्थेचे संदीप अजमेरे,राजेश ठोळे आदीच्या हस्ते सर्व पत्रकारांचा भेटवस्तु व गुलाबपुष्प देवुन गौरव करण्यात आला.


या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात जेष्ठ पत्रकार नानासो जवरे यांनी पत्रकारांनी निरपेक्ष व तटस्थ भावनेने पत्रकारीता करावी,व सर्व सामान्यांच्या प्रश्नाला न्याय दयावा असे सुचविले.आणि पत्रकार दिना निमित्तानं आम्हां पत्रकाराचा गौरव केला या बद्दल विदयालयांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.मिना पाटणी,दै.लोकमतचे रोहीत टेके, दै.लोकसत्ता,पुढारीचे महेश जोशी,दै.दीव्य मराठीचे संजय देशपांडे,सोमनाथ सोनपसारे, विजय कापसे, लक्ष्मण वावरे,मनिष जाधव,बिपिन गायकवाड,योगेश डोखे,शैलेश शिंदे,सुनिल ससाणे,हाफीज शेख,अनिल दीक्षित,हेमचंद्र भवर,संतोष जाधव,शैलेश शिंदे,शाम गवंडी,रवि जगताप,फकीरा टेके,संजय भारती,विनोद जवरे,मधुकर वक्ते,अमोल गायकवाड,आदी मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश गोरे यांनी तर आभार विदयालयाचे पर्यवेक्षक श्रीमती उमा रायते यांनी मानले.
या कार्यक्रमाला श्री.अनिल अमृतकर,निलेश बडजाते,अनिल काले,अतुल कोताडे,दीलीप कुडके,योगेश गवळे,आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
